वाळू उपसा करणा:या दोन बोटी स्फोटाद्वारे नष्ट
By admin | Published: April 9, 2017 11:32 AM2017-04-09T11:32:59+5:302017-04-09T11:32:59+5:30
सरपणी नदी व उकई धरणाच्या बॅक वॉटरमधून सुरू असलेला वाळूचा अवैध उपशातील दोन लोखंडी बोटी अखेर जिलेटीनच्या स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आली.
Next
नवापूर, दि.9- तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील सरपणी नदी व उकई धरणाच्या बॅक वॉटरमधून सुरू असलेला वाळूचा अवैध उपशातील दोन लोखंडी बोटी अखेर जिलेटीनच्या स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आली.
महाराष्ट्र- गुजरात सिमेवरील सरपणीनदी आणि उकईच्या बॅक वॉटरमधून शासकीय ठेका नसतांनाही मोठय़ा प्रमाणावर वाळू उपसा करण्यात येत होता. त्याची माहिती प्रशासनास मिळताच प्रांताधिकारी निमा आरोरा यांच्या पथकाने 5 एप्रिल रोजी कारवाई करीत लाखोंचे साहित्य जप्त केले होते. त्यात वाळू उपसा करणा:या दोन लोखंडी बोटी पाण्यातून काढणे कठीण असल्यामुळे त्या तेथेच नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रांताधिकारी निमा आरोरा यांच्या सुचनेनुसार या दोन्ही बोटींना जिलेटीनच्या कांडय़ा लावून स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आली. (वार्ताहर)