नवापुरात पालिका आणि आरोग्य विभागाकडून स्वच्छता व तपासणी मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:59 AM2019-09-24T11:59:00+5:302019-09-24T11:59:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शहरातील दोन बालकांचा डेंग्युसदृश तापाने बळी गेल्याचे व 40 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु ...

Sanitation and inspection drive by the municipality and health department in Navapur | नवापुरात पालिका आणि आरोग्य विभागाकडून स्वच्छता व तपासणी मोहिम

नवापुरात पालिका आणि आरोग्य विभागाकडून स्वच्छता व तपासणी मोहिम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : शहरातील दोन बालकांचा डेंग्युसदृश तापाने बळी गेल्याचे व 40 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका व आरोग्य विभागाने शहरात स्वच्छता मोहिम रावबून रुग्ण तपासणीला सुरुवात केली आह़े शहरातील विविध भागात ही मोहिम वेगात सुरु आह़े 
फरहान मकराणी (12) व अब्दुल खालीक महंमद माकडा (17 ) या दोघांचा डेंग्यू सदृश्य तापाची लागण झाल्याने गेल्या दोन दिवसात मृत्यू झाला होता़ ‘लोकमत’च्या वृत्तानंतर पालिका प्रशासनाकडून नारायणपूर रोड व शास्त्रीनगर भागात पालिकेच्या सहकार्याने तालुका आरोग्य विभागाकडून दोन धूर फवारणी यंत्राची नियुक्ती करुन फवारणी केली जात आह़े पालिकेकडुन औषध फवारणीसाठी 40 लीटर डिङोल व 10 लीटर पेट्रोल उपलब्ध करुन देण्यात आले आह़े दरम्यान पालिकेने सफाईच्या कामांना वेग दिल्याचे सोमवारी दिसून आल़े    
शहरातील नारायणपूर रोड, धडधडय़ाफळी, शास्त्रीनगर, शितल सोसायटी या भागातील डेंग्यूसदृश्य तापाचे बळी असलेले रुग्ण गुजरात राज्यातील व्यारा, बारडोली व सुरत येथे दाखल आहेत. या भागात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बागले, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी यांनी 10 पथकांसह भेटी देत संशयित रुग्णांचे रक्त नमुने संकलित केल़े हे नमुले तपासणीसाठी तातडीने नंदुरबार येथे पाठविले आह़े मंगळवारी त्यांचा अहवाल मिळणार आहे. दरम्यान शहरात सुरु असलेल्या आरोग्य तपासणीतून आणखी रुग्ण समोर येण्याची भिती वर्तवण्यात येत आह़े
 

Web Title: Sanitation and inspection drive by the municipality and health department in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.