सरदार सरोवर पूर्ण भरले; महाराष्ट्राला काय मिळाले?, मेधा पाटकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 12:55 AM2020-09-18T00:55:42+5:302020-09-18T00:56:08+5:30

सरदार सरोवर प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला प्रकल्प पूर्ण भरला होता. यंदाही १७ सप्टेंबरचे औचित्य साधून तो भरला आहे.

Sardar Sarovar filled up; What did Maharashtra get ?, Medha Patkar's question | सरदार सरोवर पूर्ण भरले; महाराष्ट्राला काय मिळाले?, मेधा पाटकर यांचा सवाल

सरदार सरोवर पूर्ण भरले; महाराष्ट्राला काय मिळाले?, मेधा पाटकर यांचा सवाल

Next

नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण करून गुजरात सरकारने तो पूर्ण जलस्तरपर्यंत भरला. पण महाराष्टÑातील विस्थापितांचे अद्यापही ना पूर्ण पुनर्वसन झाले, ना महाराष्टÑाला त्याचा काही लाभ मिळाला. यासंदर्भात महाराष्टÑ शासन काही विचार करणार आहे का, असा सवाल नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला आहे.
सरदार सरोवर प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला प्रकल्प पूर्ण भरला होता. यंदाही १७ सप्टेंबरचे औचित्य साधून तो भरला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर व आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबतचे विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशात ज्या पद्धतीने जलसत्याग्रह सुरू आहे तसे आंदोलन महाराष्टÑातही करण्याचा इशारा त्यांनी या पत्रात दिला आहे.

Web Title: Sardar Sarovar filled up; What did Maharashtra get ?, Medha Patkar's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.