सरदार सरोवर पुनर्वसन सहा आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:09 PM2018-02-23T13:09:13+5:302018-02-23T13:09:13+5:30

Sardar Sarovar rehabilitation centers fill vacancies in six health centers | सरदार सरोवर पुनर्वसन सहा आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरणार

सरदार सरोवर पुनर्वसन सहा आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांच्या सहा पुनर्वसन गावांमधील शासकीय दवाखान्यांमधील कर्मचा:यांच्या रिक्त जागांना आरोग्य विभागाने मान्यता दिल्याने येथील कर्मचा:यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे तळोद्यासह, अक्कलकुवा व शहादा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. साधारण 11 पुनर्वसन वसाहतींमध्ये जवळपास चार हजारापेक्षा अधिक कुटुंबांचे तेथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या कुटुंबांसाठी राज्य शासनाने पुनर्वसन वसाहतीमध्ये पुनर्वसन करतानाच दवाखाने बांधून दिले आहेत. मात्र या दवाखान्यांमध्ये अजूनही पुरेसे कर्मचारी नियुक्त केलेले नव्हते. साहजिकच तेथील रहिवाशांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. जे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यावरही इतर दवाखान्याच्या अतिरिक्त कारभारामुळे या विस्थापितांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे चित्र होते. या वसाहतीतील दवाखान्यामधील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात यासाठी विस्थापितांनी संबंधीत जिल्हा परिषद व शासनाच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने मागणी केली होती. त्याच बरोबर जिल्हा परिषदेनेदेखील पाठपुरावा केला होता. या पाश्र्वभूमिवर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील गोपाळपूर, वाडीजावदा, वडछील, त:हावद, चिखली व काथर्दे दिगर या पुनर्वसन वसाहतीतील दवाखान्यांमधील रिक्त जागांना नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रत्येक दवाखान्यातील एकूण चार पदांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, आरोग्य सेविका व शिपाई अशा पदांचा समावेश आहे. या दवाखान्यांमधील रिक्त जागांबाबत आरोग्य विभागाने कर्मचा:यांना मान्यता दिल्यामुळे वसाहधारकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. मात्र आता रिक्त पदांची भरतीची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी विस्थापीतांनी केली आहे.

Web Title: Sardar Sarovar rehabilitation centers fill vacancies in six health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.