सातपुडय़ात ‘कल्पवृक्ष’ महूचा भरला महोत्सव

By admin | Published: March 29, 2017 12:48 PM2017-03-29T12:48:35+5:302017-03-29T12:48:35+5:30

सातपुडय़ात ‘कल्पवृक्ष’ असे म्हटले जाणा:या महू झाडाला येणा:या महू फुलांच्या उपयोगाबाबत चोंदवाडे बुद्रुक येथे महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Satpuradaya 'Kalpavraksha' Mahla of Bharla Festival | सातपुडय़ात ‘कल्पवृक्ष’ महूचा भरला महोत्सव

सातपुडय़ात ‘कल्पवृक्ष’ महूचा भरला महोत्सव

Next

 चोंदवाडे बुद्रुक येथे उपक्रम : महू फुलापासून खाद्यपदार्थ प्रदर्शन व महू झाड संवर्धनावर चर्चा  

धडगाव,दि.29- सातपुडय़ात ‘कल्पवृक्ष’ असे म्हटले जाणा:या महू झाडाला येणा:या महू फुलांची साखर तपासून त्यापासून तयार करण्यात येणा:या विविध फुलांचे प्रदर्शन धडगाव तालुक्यातील चोंदवाडे बुद्रुक  येथे भरवण्यात आले होत़े महू फुल आणि झाड याची माहिती संकलित करून संशोधनाच्या हेतूने प्रथमच झालेल्या महू महोत्सवात तालुक्यातून आदिवासी बांधव सहभागी झाले होत़े 
या महोत्सवात 39 प्रकारच्या महू झाडांची फुले गोळा करून त्यापासून विविध पदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली़ यात महिला बचत गट आणि महिलांनी सहभाग नोंदवला होता़ मार्च ते जून या कालखंडात येणारी महू फुले आणि टोळंबी यापासून तयार करण्यात येणा:या विविध वस्तू आणि पदार्थाची माहिती देण्यात येऊन, दुर्गम अतीदुर्गम भागातील दुर्लभ होत जाणा:या महू प्रजातीं संरक्षित व्हाव्यात यासाठी चोंदवाडे बुद्रुक येथे रोपवाटिकेची निर्मिती करण्यात आली़
 
महू महोत्सवात काय ?
1) लाँजिफोलिया या इंग्रजी नावाने ओळख असलेल्या महू फुलाचे झाड हे सर्वदृष्टीने उपयोगी असल्याने दुर्गम व अती दुर्गम भागात त्याला कल्पवृक्ष म्हटले जात़े महोत्सवात गुल्ली महू, रातगोल महू, डुंडाल महू, सिकटयाल महू, सिडणी महू, फाटाळ महू या सहा प्रकारांचे परीक्षण करण्यात येऊन, त्यापासून तयार होणा:या उत्पादनांची माहिती संकलित करण्यात आली़ 
2) या महोत्सवात दुष्काळ पडल्यावर आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांकडून महू फुलाचा अन्न म्हणून कशा प्रकारे वापर करत होते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आल़े तसेच बाजारात महू फुलापासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या विक्रीबाबत चर्चा करण्यात आली़ महू फुलावर संशोधन होऊन टोळंबीपासून तयार होणा:या तेलाला बाजारपेठ मिळावी याबाबत या महोत्सवात चर्चा करण्यात येऊन विविध उपाययोजना उपस्थितांकडून सुचवण्यात आल्या़ 
3) या महोत्सवादरम्यान दुर्गम भागात आढळून येणा:या 39 महू झाडांच्या प्रजातींपैकी 14 दुर्लभ अशा प्रजातींचा प्रसार व्हावा, म्हणून कलम करून त्याठिकाणी रोपवाटिका तयार करण्याच्या कामांना सुरूवात झाली़ या रोपवाटिकांमधून दरवर्षी तयार करण्यात येणारी महू झाडे दुर्गम अती दुर्गम भागासह जिल्ह्यात देण्यात येणार असल्याचे नियोजन केले आह़े रोपवाटिकेत रोप तयार करणे व इतर तत्सम कामे करण्यासाठी एक गट तयार करण्यात आला आह़े

Web Title: Satpuradaya 'Kalpavraksha' Mahla of Bharla Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.