दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर सावरतोय जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:39 AM2019-08-07T11:39:49+5:302019-08-07T11:40:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर जिल्हा सावरू लागला आहे. सातपुडय़ाच्या द:याखो:यातील रस्ते, पूल, फरशी वाहून गेले ...

Savartoi district after two days of heavy rainfall | दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर सावरतोय जिल्हा

दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर सावरतोय जिल्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर जिल्हा सावरू लागला आहे. सातपुडय़ाच्या द:याखो:यातील रस्ते, पूल, फरशी वाहून गेले असून अनेक ठिकाणी वाहतूक अद्यापही बंदच आहे. सपाटीवरील भागातील शेकडो एकर शेती पाण्याखाली असून काही ठिकाणी शेतीचे नाल्यात रुपांतर झाले आहे. पावसाच्या उघडीपनंतर प्रशासनाने पंचनाम्यांना गती दिली आहे.
धडगाव तालुक्यात अनेक रस्ते बंद
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सातपुडय़ाच्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील गाव व पाडय़ांमध्ये आठवडाभर अतिवृष्टी झाल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे. गाव व पाडय़ांना जोडणारे रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून संसारोपयोगी साहित्य, धान्य, गुरांसह शेतातील उभी पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमदार अॅड.के.सी. पाडवी हे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करीत आहेत. या भागातील दळणवळवण सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अनेक ठिकाणी शेतातील कापूस, भात, मका, उडीद, चवळी, ज्वारी व इतर पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके खराब होत आहेत. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची सूचना आमदार अॅड.पाडवी यांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे आरोग्याची समस्या उद्भवू नये म्हणून धडगाव रुग्णालयाचीही त्यांनी पाहणी केली.
वेलखेडी व डेब्रामाळ येथे
घरांची पडझड
अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागातील वेलखेडी येथे पावसाच्या संततधारेमुळे नदीजवळील एकाचे कौलारू घरासह चार विजेचे खांब वाहून गेले तर डेब्रामाळ येथील एकाचे कौलारू घर कोसळून नुकसान झाले आहे. वेलखेडी येथील वनसिंग तुक्या तडवी यांच्या घराचा काही भाग कोसळू लागताच घरातील सदस्य घराबाहेर निघाले व बघता बघता पूर्ण घरच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यात घरातील कोंबडय़ा व संसारोपयोगी साहित्य पूर्ण वाहून गेल्याने त्यांचे  मोठे नुकसान झाले. बारीपाडा येथील सरपंच यांच्या घराजवळील चार विजेचे खांब तारांसह वाहून गेले तर डेब्रामाळच्या कारभारीपाडा येथील राया बिज्या वळवी यांचे कौलारू घर कोसळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
भराव खचल्याने
डेब्रामाळकडे जाणारा रस्ता बंद
अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी ते वेलखेडी दरम्यान बारीपाडय़ाच्यावर पावसाच्या संततधारेमुळे रस्त्याचा भराव वाहून रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. डेब्रामाळकडे जाणारा रस्ता पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे डेब्रामाळ, पळासखोब्रा, सांबर, कंजाला,          मांडवा, डनेल, बुंदेमालपाडा,            मुखडी, अक्राणीच्या माकडखुंट, सुपवापाडा, आंबावावीपाडा या गाव व पाडय़ातील नागरिकांचे हाल होत आहेत. या भागातील नागरिकांना पायवाटेचा आधार घ्यावा लागत आहे. संबंधित विभागाने रस्ता सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सरपंच भिमसिंग राजा वळवी, पोलीस पाटील पोपटीबाई सखाराम वळवी, उपसरपंच वनकर नोबल्या वळवी व नागरिकांनी केली आहे.
वैजाली व नांदर्डेत पिकांचे नुकसान
शहादा तालुक्याती वैजाली गावात मुसळधार पावसामुळे वाकी नदीला आलेल्या पुराचे पाणी वैजाली व नांदर्डे गावात व शेतात शिरल्याने उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. यावर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने उशिरा पेरण्या झाल्या. नंतर टप्प्याटपप्प्याने पाऊस आल्याने पिके चांगलीच बहरू लागली होती. वेळेवर निंदणी, कोळपणी, खते दिल्याने पीक पिरस्थिती चांगली दिसत असताना गेल्या आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने परिसरातील नदी-नाल्यांना मोठे पूर आल्याने नांदर्डे गावातील आदिवासी वस्तीतील घरांमध्ये वाकी नदीचे पाणी शिरले. वैजाली गाव हे वाकी नदीच्या काठावर वसले असून गावात व शेतात नदीने उग्र रूप धारण केले होते. शेतातील उभे पिके जमीनदोस्त झाली आहेत. सोनवलतर्फर्ेे बोरद गावात गावालगतच्या नाल्याचे पाणी वस्तीत गेल्याने घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील वाकी नदी नदी, देवापाठ नाला, लेंडय़ा नाला, मोत्या नाला आदींसह छोटेमोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. वैजाली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पाण्याने वेढा घातल्याने गावातील नवीन वसाहतीतील रस्त्यावरुन पाणी वाहत होते. वाकी नदीचे पाणी शेतांमध्ये गेल्याने पूर्ण परीसर जलमय झाला होता. शासनाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे. गेल्या तीन वर्षापासून कोरडे असलेले नदी-नाले दुथडी भरुन वहात असल्याने पाण्यात पातळीत चांगलीच वाढ होणार असल्याचे शेतक:यांनी सांगितले.

मोड परिसरात पिकांचे नुकसान
पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी उपाययोजना न केल्याने मोड गावाजवळील पुनर्वसन वसाहतीत पाणी शिरुन अनेक घरे पाण्याखाली आली होती. तसेच मोड, पुनर्वसन वसाहतीतील शेतक:यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. या परिसरातील पुनर्वसन वसाहतींमध्ये व शेतांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पाहणी केली. मोड, खेडले, त:हावद, खरवड शिवारात साचणारे पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना नसल्याने पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचते व पिकांचे नुकसान होते. त्यामुळे या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी मोड येथील शेतकरी रमण टिला चौधरी, काशीनाथ श्रीपत चौधरी, बुलाखी रामदास पाटील, अमृत पाटील व परिसरातील गावांमधील शेतक:यांनी केली आहे. याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदारांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
 

Web Title: Savartoi district after two days of heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.