दशामातेला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:42 PM2019-08-12T12:42:35+5:302019-08-12T12:42:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : ‘दशा माता की जय’च्या जयघोषात चैतन्यमय व भक्तीमय वातावरणात दशामाता मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी शनिवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : ‘दशा माता की जय’च्या जयघोषात चैतन्यमय व भक्तीमय वातावरणात दशामाता मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी शनिवारी रात्री 12 वाजेपासून येथील तापी काठावर गर्दी केली होती. येथील केदारेश्वर मंदिराजवळील तापी नदीच्या घाटावर विधीवत पूजाअर्चा करून दशामाता मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
जिल्ह्यात भाविकांनी यंदाही मोठय़ा उत्साहात दशामाता मूर्तीची स्थापना केली होती. त्यानिमित्त दररोज पूजाअर्चा, उपवास, आरती, भजन-किर्तन, जागरण व धार्मिक कार्यक्रम गावागावात सुरू होते. दहा दिवसांच्या या उत्सवात महाप्रसादही वाटप करण्यात आला. शनिवारी रात्री 12 वाजेनंतर ठिकठिकाणाहून वाजत-गाजत दशामाता मूर्ती विसर्जन मिरवणुका निघाल्या. त्या प्रकाशा येथील केदारेश्वर महादेव मंदिराजवळच्या तापी घाटावर दाखल झाल्या. काही गावातून विविध वेशभूषा केलेले भाविक आपापल्या पथकासह दाखल होत होते. त्यामुळे चैतन्यमय व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. विधीवत पूजाअर्चा, आरती करून दशामाता मूर्तीचे तापी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. नंदुरबारकडून येणा:या काही भाविकांनी तापी नदीवरील पुलावरूनच मूर्तीचे विसर्जन केले तर शहादाकडून येणा:या भाविकांनी गोमाई नदी पुलावरून मूर्तीचे विसर्जन केले.
अतिवृष्टीमुळे वाहतुकीचे विविध मार्ग बंद झाले होते. हे मार्ग हळूहळू पूर्ववत होत आहेत. परंतु संततधार सुरू असून रस्ता कधीही बंद पडू शकेल या भितीपोटी काही गावातील भाविकांनी प्रकाशा येथे न येता आपापल्या गावानजीकच्या नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन केले. असे असले तरी येथील केदारेश्वर मंदिराजवळ दिवसभरात हजारो भाविकांनी येऊन मूर्तीचे विसजर्न केले. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर व सद्गुरू ट्रस्टतर्फे हायमस्ट दिवे लावून उजेडाची सोय केली होती. प्रकाशा ग्रामपंचायतीने साफसफाईची कामे केली होती. पोलिस विभागामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, 60 पोलीस व महिला कर्मचा:यांनी बंदोबस्त ठेवला होता.
वाहतुकीला अडथळा
शहादाकडून दशामाता मूर्ती विसजर्नासाठी येणा:या भाविकांच्या वाहनांना मध्यरात्री अडीच वाजता अडथळ्यांचा सामना करावा लागला. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत लांबोळा गावाजवळचा महामार्ग खचला आहे. परिणामी एकेरी वाहतूक सुरू होती. मूर्ती विसर्जनासाठी येणा:या वाहनांची त्यात भर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. हवालदार गौतम बोराळे व कर्मचा:यांनी नियोजन करुन वाहतूक सुरळीत केली. मध्य रात्री तीन वाजेनंतर वाहतूक सुरळीत झाली.