आकर्षक राख्यांनी सजली नंदुरबारातील बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 02:53 PM2018-08-25T14:53:51+5:302018-08-25T14:54:02+5:30

सलग सुटय़ांमुळे उत्साह : जीएसटीतून वगळल्याने समाधान, पारंपारिक राख्यांना मागणी

Sazali market in Nandurbar with attractive seductive | आकर्षक राख्यांनी सजली नंदुरबारातील बाजारपेठ

आकर्षक राख्यांनी सजली नंदुरबारातील बाजारपेठ

Next

नंदुरबार : अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या राखी पौर्णिमेनिमित्त नंदुरबारातील बाजारपेठ विविध आकर्षक राख्यांनी सजली आह़े यंदाच्या वर्षी राख्यांना जीएसटीतून (सेवा कर) वगळण्यात आले असल्याने सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े
यंदा राखी पौर्णिमेचा सण रविवारी आला असल्याने या सणाचा आनंद अधिकच वाढला आह़े भाऊ व बहिणीचे नाते अधिक घट्ट करणारा हा सण भावाला राखी बांधून साजरा करण्यात येत असतो़ अनेक  चाकरमानी नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतात़ त्यामुळे राखी पौर्णिमेच्या दिवशी रविवारी तसेच आदल्या दिवशीही चौथा शनिवार  शासकीय कर्मचा:यांना सुटी असल्याने  अनेकांना आपापल्या आप्तेष्टांकडे तसेच गावी जाणे सोयीचे ठरणार आह़े त्यामुळे राखी पौर्णिमेच्या सणाचा आनंद अधिकच व्दिगुणीत होत           आह़े 
राखी पौर्णिमेनिमित्त नंदुरबारसह विविध तालुक्यांमध्ये बाजारपेठा सजल्या आहेत़ नंदुरबार शहरात मुख्य चौकांमध्ये राख्या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटलेली आहेत़ 
देवराख्यांसह विविध प्रकारच्या आकर्षक ‘ऐंब्रॉयडरी’ असलेल्या राख्यांना मागणी वाढली आह़े आधुनिक युगातदेखील नाविन्यपूर्व राख्यांच्या गोतावळ्यात पारंपारिक रेशमी राख्यांना तेवढीच पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आह़े यंदा जीएसटीतून राख्या वगळल्या असल्याने साधारणत 40 ते 500 रुपये डझनर्पयत राख्यांची विक्री करण्यात येत आह़े याला ग्राहकांची पसंती मिळत आह़े लहान मुलांचे आकर्षण असलेल्या ‘छोटा भिम’ या नाटिकेतील पात्राच्याही राख्या बाजारात उपलब्ध आहेत़ त्यामुळे या राख्यांना लहानग्यांकडून विशेष मागणी आह़े
लाईट असलेल्या तसेच म्युङिाकल राख्यांनाही मोठी मागणी वाढली आह़े 

Web Title: Sazali market in Nandurbar with attractive seductive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.