स्वच्छ भारत अभियानाला गैरव्यवहाराचे गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:34 PM2018-07-18T12:34:23+5:302018-07-18T12:34:29+5:30

The scandal of the clean India campaign | स्वच्छ भारत अभियानाला गैरव्यवहाराचे गालबोट

स्वच्छ भारत अभियानाला गैरव्यवहाराचे गालबोट

Next

नंदुरबार : अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ तयार शौचालयांचा दर्जा निकृष्ट असून ते वापराविना आहेत़ शौचालये तयार करण्यासाठी गुजरातच्या ठेकेदारांना कामे देऊन लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत करण्यात आला़ याआरोपानंतर दोन तालुक्यात चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल़े 
सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपाध्यक्ष सुहास नाईक, समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, महिला व बालकल्याण सभापती लताबाई पाडवी, शिक्षण सभापती हिराबाई पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे उपस्थित होत़े सभेच्या प्रारंभी मागील इतिवृत्ताचे वाचन करण्यात येऊन कामकाजाला सुरूवात करण्यात आली़ विविध विषयांना मंजूरी दिल्यानंतर सदस्यांच्या लेखी प्रश्नांअंतर्गत सदस्य नितेश वळवी यांनी दुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील शौचालयांचा मुद्दा उपस्थित केला़ यावेळी त्यांनी शौचालय निकृष्ट आहे असे लाभार्थीने करून दिलेले ‘शपथपत्र’ सभागृहात सादर केल़े 
नितेश वळवी म्हणाले की अक्कलकुवा तालुक्यातील 912 शौचालयांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे सव्रेक्षण आह़े तर उर्वरित शौचालयांना एकच टाकी आह़े पाण्याच्या टाक्यांविना असलेल्या शौचालयांचा प्रश्न गंभीर असूनही स्वच्छ भारत अभियान कक्षाकडून कारवाई झालेली नाही़ सदस्य योगेश पाटील यांनीही धडगाव तालुक्यात 1 हजार 240 शौचालयांचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट असून लाभार्थी त्यांचा ुइच्छा असूनही वापर करू शकत नसल्याचे सांगितल़े त्यांच्या आरोपांवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी यांना उत्तर न देता आल्याने सभागृहात उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ यातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल़े समितीत दुस:या तालुक्याचे अधिकारी दोन्ही तालुक्यात जाऊन पाहणी करणार आहेत़ 
सभेत बांधकाम विभागाकडून त:हावद ते प्रकाशा या सात किलोमीटर रस्त्याचे काम का पूर्ण होत नाही असा प्रश्न ज्येष्ठ सदस्य रामचंद्र पाटील यांनी उपस्थित करत अधिकारी सत्ताधा:यांचेही ऐकत नसल्याची खंत व्यक्त केली़ विविध विभागांचा आढावा घेण्यात येऊन ठरावांना मंजूरी ेदेण्यात आली़ 
 

Web Title: The scandal of the clean India campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.