अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नंदुरबार दौरा : झाडाझडतीसह चौकशीचेही आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:17 PM2018-02-03T12:17:08+5:302018-02-03T12:17:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज जिल्ह्यातील आदिवासी उपयोजनेअंतर्गत विविध कामांची पहाणी केली. काही ठिकाणी समितीला त्रुटी आढळून आल्याने त्या मुदतीत दूर कराव्या अशा सुचनाही देण्यात आल्या. समितीच्या 12 सदस्यांनी तीन विभाग वाटून घेतल्याने दिवसभरात जवळपास 42 ठिकाणी या समितीने भेटी दिल्या. त्यामुळे जिल्हाभरात शुक्रवारी समितीच्या भेटींचीच चर्चा होती.
समिती गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाली होती. सकाळी पाच आमदार येथे पोहचले होते. सायंकाळी उशीरा सात आमदार पुन्हा दाखल झाले. काही आमदार नंदुरबारात मुक्कामाला होते तर काहींनी थेट धडगाव गाठले. शुक्रवारी समितीतील सदस्य आमदारांनी गट अर्थात उपसमिती तयार केल्या. पहिल्या उपसमितीत समिती प्रमुख म्हणून आमदार श्रीकांत देशपांडे तर सदस्य म्हणून आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा, आमदार संजय कांबळे यांचा समावेश होता. या उपसमितीने नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कामांना भेटी दिल्या. दुस:या उपसमितीचे प्रमुख आमदार अशोक उईके होते. सदस्य म्हणून आमदार संतोष टारफे, आमदार पास्कर धनारे, आमदार प्रभुदत्त भिलावेकर व आमदार राजेश तारवी यांचा समावेश होता. या समितीने तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील कामांना भेटी दिल्या. तिस:या उपसमितीचे प्रमुख आमदार वैभव पिचड होते. सदस्य म्हणून आमदार पांडुरंग वरोरा, आमदार आनंद ठाकुर यांचा समावेश होता. या समितीने शहादा व धडगाव तालुक्यातील कामांना भेटी दिल्या.
अनेक ठिकाणी अनियमितता आढळल्याने झाडाझडतीही झाली. चौकशीचेही आदेश देण्यात आले.