शाळेची घंटा वाजली शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:47+5:302021-07-16T04:21:47+5:30
प्रकाशा : गावात गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचा एकही कोरोना रूग्ण आढळून आला नाही म्हणून समितीने केलेल्या ठरावानुसार गुरूवारी प्रकाशा ...
प्रकाशा : गावात गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचा एकही कोरोना रूग्ण आढळून आला नाही म्हणून समितीने केलेल्या ठरावानुसार गुरूवारी प्रकाशा येथील सर्वोदय विद्यामंदिर विद्यालय सुरू करण्यात आली. त्यात इयत्ता आठवी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी शाळेत आले होते.
याबाबत असे की, महसूल, ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य या विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार १५ जुलै रोजी आठवी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानुसार सकाळी विद्यार्थी शाळेत आले होते. शाळेकडून आधी विद्यार्थ्यांचे हात सॅनिटायझर करण्यात आले. त्यानंतर थर्मल स्कॅनिंकद्वारे तापमान मोजले, ऑक्सीमीटरने विद्यार्थ्यांचे ऑक्सीजन चेक करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात बसवण्यात आले.एक बाक सोडून एका विद्यार्थ्यांला बसविण्यात आले.
बऱ्याच महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य दिसून आले. शिक्षकांनी आलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या विषयानुसार शिकविले.
पहिला दिवस होता तरी अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी आले होते. मात्र कोरोनाचे नियम पाळात, सेल्फ डिस्टन्स ठेवत शाळा सुरू करण्यात आली.
शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा सुरू करण्यात आली. दोन दिवसापूर्वी शाळेतील शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये सर्व शिक्षकांचे रिपोर्ट नील आले असून, या शिक्षकांनी शिकायला सुरूवात केली. - प्राचार्य ए.के.पटेल, सर्वोदय विद्यामंदिर, प्रकाशा