नवापुरात ४५ हजाराची लाच घेताना शाळेचा लिपिक गजाआड
By मनोज शेलार | Published: June 22, 2023 04:37 PM2023-06-22T16:37:33+5:302023-06-22T16:37:50+5:30
नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
नंदुरबार : स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्याचे रजा रोखीकरणाची रक्कम काढून देण्याच्या बदल्यात ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवापूर येथील सार्वजनिक हायस्कूलच्या लिपिकास रंगेहात पकडण्यात आले. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
विनोद साकरलाल पंचोली (५०) वरिष्ठ लिपिक, दी. एन. डी. ॲण्ड एम.वाय सार्वजनिक हायस्कूल नवापूर असे लाच स्वीकारणाऱ्या संशयिताचे नाव आहे. या शाळेतील एक कर्मचारी यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यांचे रजा रोखीकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊन ती रक्कम तक्रारदार यांच्या बॅंक खात्यात जमा झाली होती. ती रक्कम काढून दिल्याबद्दल ४५ हजार रुपयांची लाच पंचोली हे मागत होते. २१ जून रोजी ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राकेश चौधरी, हवालदार विलास पाटील, ज्योती पाटील, देवराम गावित, अमोल मराठे यांनी केली.