डाब केंद्रांतर्गत शेलपाणी येथे शालेय क्रीडा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:06 PM2020-01-25T13:06:50+5:302020-01-25T13:07:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार: शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्व रुजविण्यासाठी शेलपाणी ता.अक्कलकुवा येथे डाब केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार: शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्व रुजविण्यासाठी शेलपाणी ता.अक्कलकुवा येथे डाब केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात १९ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच जयाबाई तडवी, फत्तेसिंग तडवी, कांतीलाल तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत कबड्डी, धावणे, लंगडी यासह अन्य सामुहिक व वैयक्तीक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेया कबडडी, लंगडी या क्रीडाप्रकारात डाब येथील शाळा विजयी ठरली. तर वालंबा शाळेनेही स्पर्धेत चांगली कामगिरी बजावली. यशस्वी संघांचा केंद्रप्रमुख बी.पी.पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वी संघांना तालुकास्तरीय स्पर्धेसाठी संधी देण्यात येणार आहे, यासाठी विजयी संघांच्या शाळांमार्फत तयारी सुरु झाली आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजू पवार, रमेश तावडे, ओंकार पाटील, बहादूरसिंग पाडवी, किसन पाडवी, मोजू पराडके, सुरेश पाडवी, प्रवीण तडवी, कनारायण तडवी, पंढरीनाथ धनगर, देवेंद्र वाघ, जीवन कोकणी, सत्तारसिंग राजपूत भिमसिंग गावीत, रायसिंग पाडवी, धनराज सोनवणे, रुपसिंग पाडवी, ब्रिजलाल वसावे, दिलवरसिंग पाडवी, बाबूराव पाडवी, दीपमाला पाटील, चेतना तावडे, सुनिता वळवी, अनिता वसावे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन रामकृष्ण बागला यांनी केले तर आभार किसन तडवी यांनी मानले.