पायपीट करुन गाठावी लागते शाळा : छोटाधनपूर ते बोरद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:06 PM2018-03-15T12:06:57+5:302018-03-15T12:06:57+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील छोटाधनपूर ते बोरद दरम्यान एसटी बसेसच्या फे:या होत नसल्याने गावातील तब्बल 167 विद्याथ्र्याना दररोज पायपीट करुन शाळा गाठावी लागत असल्याची स्थिती आह़े या मार्गावर त्वरीत बसफे:या सुरु कराव्या अशी मागणी करण्यात येत आह़े
छोटाधनपूर येथून 90 विद्यार्थिनी तर 77 विद्यार्थी दररोज बोरद येथील माध्यमिक शाळेत जात असतात़ परंतु रस्त्याच्या दुरावस्थेचे कारण पुढे करुन अक्कलकुवा आगाराकडून एसटी बससेवा बंद करण्यात आल्याने आता या विद्याथ्र्याना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आह़े त्यामुळे विद्याथ्र्यासह पालकांकडूनही आता नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा ते छोटाधनपूर र्पयत एसटी बस जात असून धनपूर ते बोरद या मार्गावर बसफे:या बंद आहेत़ त्यामुळे परिणामी विद्याथ्र्यासमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत़ याचा परिणाम विद्याथ्र्याच्या शैक्षणिक जीवनावरही होत असल्याचे सांगण्यात येत आह़े
त्यामुळे अक्कलकुवा आगाराकडून त्वरीत या मार्गावर फे:या सुरु करण्यात याव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून आता जोर धरु लागली आह़े
छोटा धनपूर या गावाची लोकसंख्या साधारणत 2 हजार 900 इतकी आह़े त्यामुळे साहजिकच या गावात दळणवळण व्यवस्थेला अत्यंत महत्व आह़े या गावातील विद्यार्थी सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात शाळेत जात असतात़ सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आह़े त्यामुळे दुपारच्या सत्रात शाळेत जाणा:या विद्याथ्र्याना उन्हामध्येच पायपीट करीत शाळा गाठावी लागत असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आह़े धनपूर गाव हे संपूर्णपणे आदिवासी लोकवस्तीचे गाव आह़े त्यामुळे येथील विद्याथ्र्याना शिक्षणाच्या मुळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाकडून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असतात़ परंतु विद्याथ्र्याना शाळेत जाण्यासाठी अशी पायपीट करावी लागत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आह़े शाळेत जाण्यासाठी सोयीसुविधा नसल्याने अनेक आदिवासी विद्याथ्र्याना शिक्षणापासून वंचित रहावे लागत असत़े
एकीकडे मराठी शाळा टिकवण्यासाठी शासनाकडून नवनवीन योजना, उपक्रम हाती घेण्यात येत असताना दुसरीकडे दळणवळण सुविधेअभावी विद्याथ्र्याना वंचित रहावे लागत आह़े
दरम्यान, अक्कलकुवा एसटी आगाराकडून खड्डे असल्याचे कारण पुढे करीत बसफे:या बंद करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आह़े
त्याच प्रमाणे रस्त्याच्या दुतर्फाही काटेरी झुडपे असल्याने एसटीच्या चालकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े त्यामुळे एसटी महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी समन्वय साधत कामे केल्यास विद्याथ्र्याचे होत असलेले शैक्षणिक नुकसान थांबू शकते अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े