नंदुरबार जि.प.च्या कामांच्या यादीला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:11 AM2018-12-22T11:11:03+5:302018-12-22T11:11:08+5:30
स्थायी समिती : बैठकीत नव्याने ठराव करून जिल्हाधिका:यांकडे पाठविणार
नंदुरबार : ग्रामपंचायतींच्या जनसुविधाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या 132 कामांच्या यादीत केवळ 42 कामेच जिल्हा परिषदेने सुचविलेली कामे समाविष्ट आहेत. 44 कामे वगळण्यात आल्यामुळे जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, सदस्य रतन पाडवी, सागर धामणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतींना जनसुविधेअंतर्गत कामांसाठी पैसा उपलब्ध नाही.
2018-19 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेने ठराव करून 86 कामांची यादी जिल्हाधिका:यांकडे पाठविली होती. परंतु जिल्हाधिका:यांकडून आलेल्या 132 कामांच्या यादीत जिल्हा परिषदेने सुचविलेल्या केवळ 42 कामांचा समावेश आहे. 44 कामे वगळण्यात आली आहेत. जी कामे आहेत त्यात पालकमंत्र्यांनी सुचविलेल्या कामांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या 44 कामांचा ठराव करून तो पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे ठरविण्यात आले.
अक्कलकुवा, धडगाव परिसरात दोन, तीन वर्षापासून लसीकरण करण्यात आलेले नाही. आपल्या घरच्या पाळीव जनावरांना देखील लसीकरण करण्यात आलेले नसल्याचे सभापती हिराबाई पाडवी यांनी सांगितले. त्यावर पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पाटील यांनी रिक्त पदांमुळे लसीकरणातत अडचण येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वच भागात व सर्वच जनावरांना लसीकरण करण्यासाठी प्रय} सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
अंगणवाडी स्तरावर काही संस्थांचे प्रतिनिधी सव्र्हे करतांना आढळून येतात. विशेषत: दुर्गम भागात असे प्रकार नेहमीच निदर्शनास येतात. असा काही सव्र्हे सुरू आहे का? आणि असल्यास कोणत्या संस्थेला काम देण्यात आले आहे अशी विचारणा रतन पाडवी यांनी केली. त्यावर बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भवाने यांनी अशी कोणतीही संस्था नेमण्यात आलेली नाही. तसे कुणी आढळल्यास संबधीतांची तक्रार करावी, कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत पाणी टंचाई, अंगणवाडी मदतनीस भरती, रिक्त पदे, जलयुक्त शिवार यासह इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सुहास नाईक यांनी शाळाबाह्यय विद्याथ्र्याचा प्रश्न उपस्थित केला. ‘लोकमत’ने लावलेल्या वृत्तमालिकेचा उल्लेख करीत त्यांनी याबाबतची आकडेवारी स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी सांगितले, यंदाच्या सव्र्हेक्षणात शाळाबाह्य व स्थलांतर झालेली एकुण 3,444 विद्यार्थी आढळून आले. तर 702 विद्याथ्र्याचे स्थलांतर रोखण्यात आले. 306 परजिल्ह्यातून स्थलांतर होऊन आलेले आहेत. स्थलांतर रोखण्यात आलेल्या विद्याथ्र्यासाठी 17 अनिवासी वसतिगृह मंजुर करण्यात आली आहेत. तर स्थलांतर होऊन आलेल्या विद्याथ्र्याना जवळच्या शाळांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शाळाबाह्य विद्यार्थी सव्र्हेक्षणात कसूर करणा:या कर्मचा:यांना नोटीसा बजावण्यात येणार असल्याचेही डॉ.राहुल चौधरी यांनी स्पष्ट केले.