79 जणांची स्क्रिनिंग तर 1,244 कुटूंबावर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:40 PM2020-04-24T12:40:29+5:302020-04-24T12:40:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या संपर्कातील आतार्पयत 29 जणांचे ...

Screening of 79 people and attention to 1,244 families | 79 जणांची स्क्रिनिंग तर 1,244 कुटूंबावर लक्ष

79 जणांची स्क्रिनिंग तर 1,244 कुटूंबावर लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या संपर्कातील आतार्पयत 29 जणांचे स्वॉब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत तर तब्बल 79 सेकंडरी कॉन्टॅक्टमधील लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे.  मयताच्या  राहत्या घराच्या परिसरातील कंटेनमेंट झोनमधील 1,244 कुटुंबातील 5,816 इतक्या नागरिकांना वर सक्रीय लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.  
 शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील माता व व्यापारी असलेला पूत्र कोरोना विषाणू संक्रमितांपैकी पूत्राचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने मयत व्यापाराच्या संपर्कातील पाच नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून आतापयर्ंत यांची संख्या 29 झाली आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रशासन कमालीचे गतिमान झाले असून सर्वत्र शोध मोहीम सुरू आहे. शहरात कोरोनाचा रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर याचा संसर्ग कसा झाला हे शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
 संबंधित व्यापारी हा गेल्या महिनाभराच्या कालावधीत तालुक्यातील 16 पेक्षा अधिक गावांच्या संपर्क होतात यामुळे प्रशासनाने या सर्व गावांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.
मयताच्या घरातील 14 व इतर 10 असे एकूण 24 नमुने घेतल्यानंतर आज प्रशासनाने पुन्हा मयताच्या  संपर्कातील पाच नागरिकांना शोधले असून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान मयत व्यापाराच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी. आपले व आपल्या कुटुंबीयांच्या काळजी सोबत आपल्या गावाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.
प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 25 एप्रिल पयर्ंत कंटेनमेंट व बफर झोन अशा दोन गटात शहराची विभागणी केली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये शोधकार्य गतीमान करण्यात आलेले आहे. संपूर्ण परीसर सिल करण्यात आला असल्याने आज सलग दुस:या दिवशी कंटेनमेंट झोन मधील परिसरात शुकशुकाट होता. रस्ते निर्मनुष्य होते, नागरिकांनी घाबरू नये प्रशासनाला सहकार्य करत शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले आहे.
दरम्यान, प्रशासनातर्फे कंटेनमेंट झोनमध्ये कमालीची खबरदारी बाळगला जात असली तरी शहरातील अतिउत्साही नागरिकांनी अनेक नवीन वसाहतीमध्ये खाजगी बॅरीकेडींग लावून रस्ते बंद केले आहेत. याबाबत काही ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे. अशी एक घटना तुळशीनगर येथील एका खासगी रुग्णालयात बाबत घडली असून या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका:यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल करून नाराजी व्यक्त केली आहे. या रुग्णालयाकडे येणारे रस्ते बंद करण्याचा प्रय} काही समाजकंटकांनी केल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला.  महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने रुग्णालयाला व त्यांच्या कर्मचा:यांचा सुरक्षेचे आश्वासन देण्यात आले आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये प्रशासनाने बॅरीकेडींग केले आहे मात्र या व्यतिरिक्त अनेक वसाहतीमध्ये करण्यात आलेले खासगी  बॅरीकेडींग हे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा:यांसाठी जाचक ठरत आहे. दूध विक्रेते व गॅस सिलेंडरचा पुरवठा करणा:यांना वसाहतीमध्ये येण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला असल्याने त्याचा फटका बसला आहे.  त्यांनी दुध व गॅस सिलेंडरचा  साठा उपलब्ध असतानाही रस्ते बंद असल्याने  पुरवठा केलेला नाही. पालिका प्रशासनाने  वसाहतीत केलेले खाजगी बेरिकेटिंग काढून टाकावे अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Screening of 79 people and attention to 1,244 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.