नवीन सावरटजवळ बायोडिझेल पंप सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:11+5:302021-09-21T04:34:11+5:30
पलक बायोडिझेल ॲण्ड केमिकल्स, नवीन सावरट, ता. नवापूर जि. नंदुरबार या ठिकाणी अवैधरीत्या वाहनांमध्ये केमिकल ऑइल भरण्याचे काम सुरू ...
पलक बायोडिझेल ॲण्ड केमिकल्स, नवीन सावरट, ता. नवापूर जि. नंदुरबार या ठिकाणी अवैधरीत्या वाहनांमध्ये केमिकल ऑइल भरण्याचे काम सुरू असल्याचे सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार पुरवठा विभाग व जिल्हा प्रतिनिधी, भारत पेट्रोलियम, मनमाड यांच्या संयुक्त पथकाने आज रोजी कारवाई केली. त्यामध्ये विक्री करण्यात येत असलेल्या ऑइलचे नमुने घेण्यात आले आहेत, ते पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. पंपाच्या परिसरात भूमिगत टाक्यांना सीलबंद करण्यात आले आहे. तसेच पंपावरील पाच विक्री पॉइंट सीलबंद करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. महामार्गावरील अवैध बायोडिझेल विक्री कधी थांबेल हा संशोधनाचा विषय आहे. महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करतात लगेच एक दोन दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी बाय डिझेलची विक्री सुरू होते. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.