शहाद्यात सलग दुस:या दिवशी धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:40 PM2018-12-01T12:40:34+5:302018-12-01T12:42:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहाद्यात सलग दुस:या दिवशी धाडसी चोरी होऊन चोरटय़ांनी साडेदहा तोळे सोन्याचे दागीने लांबविले. गुरुवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहाद्यात सलग दुस:या दिवशी धाडसी चोरी होऊन चोरटय़ांनी साडेदहा तोळे सोन्याचे दागीने लांबविले. गुरुवारी सायंकाळी एका व्यापा:याची पावणे दोन लाख रुपये रक्कम असलेली बॅग चोरटय़ांनी लांबविल्यानंतर ही घटना घडल्याने शहादेकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुजर गल्ली भागात राहणारे गिरधर शंकर पाटील यांच्या घरात चोरटय़ांनी डल्ला मारला. पाटील यांच्या प}ी गोदावरी गिरधर पटेल या घरात एकटय़ा असतांना दोन युवक घरात आले. त्यांनी घराची सफाई करून देण्याचे सांगितले. परंतु महिलेने त्यांना नकार दिला. तरीही त्यांनी जबरीने घरात घुसून सफाईला सुरुवात केली. त्यानंतर महिलेच्या हातातील आठ तोळ्याच्या चार सोन्याच्या बांगडय़ा व अडीच तोळ्याची सोन्याची पोत त्यांनी पॉलीश करण्याच्या बहाण्याने काढून घेतली. त्याची किंमत सध्याच्या बाजार भावाप्रमाणे साडेतीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते घराच्या मागील दरवाजाने पसार झाले. ही बाब गोदावरीबाई यांना समजल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. परंतु तोर्पयत चोरटे पसार झाले होते. नगरसेवक राकेश सुभाष पाटील यांनी याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून तपास केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन युवक तेथून पळत असल्याचे स्पष्टपणे दिसले आहे. याबाबत सायंकाळी उशीरा शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वसुली करणा:या व्यापा:याचे
पावणेदोन लाख लंपास
गुरुवारी देखील शहाद्यात धाडसी चोरी झाली. नंदुरबार येथील व्यापारी गौतम जैन यांच्या होलसेल किराणा दुकानातून शहाद्यातील काही व्यापारी माल खरेदी करतात. त्यांच्याकडील उधारी वसुलीसाठी या दुकानाचा कर्मचारी विलास दामू पाटील हे गुरुवारी शहादा येथे आले होते. काही ठिकाणाहून वसुली केल्यानंतर ते बसस्थानक परिसरातील जैन किराणा दुकानावर वसुलीसाठी गेले असता तेथे नोटा मोजत असतांना त्यांच्याकडील पैशांची बॅग लंपास करण्यात आली. बॅगेत एक लाख 72 हजार 55 रुपये रोख होते. दोन ते पाच मिनीटात हा सर्व प्रकार झाला. परिसरात शोधाशोध केली असता उपयोग झाला नाही. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक लहान मुलगा बॅग अलगद उचलून निघाला. पुढे त्याला दोन इसमांची सोबत मिळाल्याचे स्पष्ट झाले. शहादा पोलिसात विलास दामू पाटील यांनी फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, 24 तासात सलग दोन धाडसी चो:या झाल्याने शहाद्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीचे सत्र वाढले आहे. चोरटय़ांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयांमधून करण्यात येत आहे.