दुस:या टप्प्याचे अॅपद्वारे सव्र्हेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:56 PM2019-08-09T12:56:31+5:302019-08-09T12:56:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा हगणदारीमुक्त झाला असला तरी शाश्वत स्वच्छतेसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांच्या पडताळणीसाठी मोबाईल अॅपद्वारे पुन्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा हगणदारीमुक्त झाला असला तरी शाश्वत स्वच्छतेसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांच्या पडताळणीसाठी मोबाईल अॅपद्वारे पुन्हा सव्र्हेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा नंदुरबारात झाली.
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पडताळणी टप्पा क्रमांक दोनचे प्रशिक्षण झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील,गटविकास अधिकारी अशोक पटाईत, चंद्रकांत कचरे यांच्यासह जिल्ह्याचे सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा मार्च 2018 मध्ये पायाभूत सव्र्हेक्षणानुसार हगणदारीमुक्त घोषीत करण्यात आला आहे. हगणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या स्वच्छता सुविधांचा नियमित वापर करून स्वच्छता सुविधांची शाश्वतता अबाधीत ठेवावी याकरीता पडताळणी होणार आहे. स्वच्छता विभागातर्फे ग्रामपंचायतीअंतर्गत शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणे तसेच वैयक्तिक कुटूंबांच्या स्वच्छता सुविधांची पहाणी होणार आहे. त्यासाठी पंचायत समिती स्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे.
प्रशिक्षणास सर्व गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, उमेद व कृषी विभागाचे सर्व विस्तार अधिकारी व संबधीत कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन योगेश कोळपकर यांनी केले.
नंदुरबार जिल्हा गेल्या वर्षीच हगणदारीमुक्त घोषीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कुटूंबांच्या तुलनेत शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता हगणदारीमुक्तीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्याअंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार सव्र्हेक्षण केले जाणार आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी अधिकारी, कर्मचा:यांना मोबाईल अॅपद्वारे सव्र्हेक्षण करण्याची मुभा आहे.