नंदुरबार रेल्वेस्थानकाची सुरक्षा व्यवस्था वा:यावर
By admin | Published: April 27, 2017 03:34 PM2017-04-27T15:34:34+5:302017-04-27T15:34:34+5:30
नंदुरबार रेल्वेस्थानकाची पाहणी केली़ असता येथील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा झाले आह़े
ऑनलाइन लोकमत / संतोष सूर्यवंशी
नंदुरबार, दि. 27 - देशभरात रेल्वेस्थानक, मुख्य बाजारपेठा, धार्मिक स्थळे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवाद्यांपासून धोका असल्याने प्रशासनाने हाय अलर्ट जारी केले आह़े या पाश्र्वभूमीवर नंदुरबार रेल्वेस्थानकाची पाहणी केली़ असता येथील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा झाले आह़े
गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानके तसेच रेल्वे रुळांवर काही समाजकंटकांकडून रूळ कापणे, रेल्वे रुळावर धोकादायक वस्तू ठेवणे असे प्रकार समोर आले आह़े त्यामुळे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर रेल्वेस्थानके असल्याचे यातून दिसत़े प्रशासनानेही सर्व रेल्वेस्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविली असल्याचे सांगण्यात येत आह़े मात्र याला नंदुरबार येथील रेल्वेस्थानक अपवाद आहे की काय असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आह़े याचे कारणही तेवढेच गंभीर व अनाकलनीय आह़े रेल्वे स्थानकावरील मुख्यव्दार वगळता कोठेही पोलीस यंत्रणा नाही़ रेल्वेस्थानकाचा आवाका बघता केवळ मुख्य प्रवेशव्दाराजवळच पोलीस पुरेसे आहेत काय असा प्रश्न यातून निर्माण होत आह़े
दुपारी सुरत-भुसावळ पॅसेंजर नंदुरबार रेल्वेस्थानकावर आल्यानंतर एका प्रवाशाची बॅग रेल्वेत एका सीटवर ठेवण्यात आली़ परंतु संशयितरित्या केवळ बॅग ठेवून निघून जाणारा हा व्यक्ती कोण अशी कोणाकडूनही विचारणा करण्यात आली नाही़ सुमारे 35 मिनिटे झाल्यावरही या बॅगेचा वाली कोण असा प्रश्न ना प्रवाशांना पडला ना रेल्वे प्रशासनाला़ त्यामुळे रेल्वेस्थानक व रेल्वे किती सुरक्षित आहे हेदेखील यातून दिसून येत आह़े
रेल्वे स्थानकाच्या दाद:यावरही अज्ञात नागरिक दिवसभर झोपलेले असतात. यामुळे हे रेल्वेस्थानक आहे की सार्वजनिक विश्रामगृह असा प्रश्न यामुळे निर्माण होत आह़े याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आह़े अशीच काहीशी परिस्थिती रेल्वेस्थानकाच्या इतरही परिसरात असल्याची दिसून आली़ यामुळे साहजिकच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आह़े
कुणीही या अन स्थानकाच्या विश्रामगृहात आराम करून जा.
विश्रामगृहाच्या बाहेर नियमानुसार विश्रामगृहात कोण येत आहे याची नोंद ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एक कर्मचारी ठेवणे आवश्यक असत़े परंतु या ठिकाणी विश्रामगृहात जात असतानाही कोणी हटकत नाही किंवा तिकिटाची विचारणाही करीत नाही़
रेल्वे रुळावरून प्रवाशांचा वावर
दाद:याचा वापर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असत़े मात्र याकडे प्रवासी दुर्लक्ष करीत असले तरी रेल्वे प्रशासनाकडून यावर अंकुश ठेवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही़ सुरत-भुसावळ पॅसेंजर प्लॅटफार्म क्रमांक दोनवर येते. नंदुरबारला उतरणारे प्रवासी दाद:याचा वापर न करता थेट रेल्वे रूळ ओलांडत प्लॅटफार्म क्रमांक एकवर येत स्थानकाबाहेर जातात.अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेससही याच वेळी येते. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडणे किती महाग पडू शकते हे यातून दिसून येत आह़े मात्र प्रवासी सर्रासपणे रेल्वे रूळ ओंलाडत असतानाही रेल्वे पोलीस यंत्रणा मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आह़े