खरेदीपूर्वी होणार बियाणे तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:10 PM2018-04-10T12:10:43+5:302018-04-10T12:10:43+5:30

बोगस बियाण्याला बसणार चाप : जिल्ह्यात सात तक्रार निवारण कक्षांची निर्मिती

Seed inspection before purchase | खरेदीपूर्वी होणार बियाणे तपासणी

खरेदीपूर्वी होणार बियाणे तपासणी

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 10 : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात 9 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेल्या ज्वारीची बोगस बियाण्यामुळे वाताहत झाली होती़ यातून पुन्हा शेतक:यांची फसवणूक टाळता यावी म्हणून बियाणे विक्री होण्यापूर्वी कृषी विभागाच्या पथकांकडून त्यांचे नमुने तपासण्यात येणार आहेत़ 
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून येत्या 15 मे नंतर शेतकरी खरीपासाठी बियाणे खरेदी करणे सुरू करणार असल्याने विभागाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान गेल्या वर्षी नुकसान झालेल्या 800 ज्वारी उत्पादक शेतक:यांना अद्यापही ग्राहकमंचाकडून योग्य त्या प्रकारे नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने समस्या कायम आह़े ग्राहकमंचाकडे बहुतांश शेतकरी वेळावेळी पाठपुरावा करत आहेत़ मात्र वर्ष उलटूनही समाधानकारक कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आह़े जिल्ह्यात गेल्या वर्षी 21 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप ज्वारीची पेरणी करण्यात आली होती़ यापैकी 8 हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आलेल्या 9 नंबर ज्वारीचे बियाणे पूर्णपणे खराब आल्याने शेतक:यांच्या हाती केवळ कडबा आला होता़ याबाबत शेतक:यांनी वेळावेळी पाठपुरावा केल्यानंतर कृषी विभागाने 4 बियाणे कंपन्यांच्याविरोधात पुणे कृषी संचालनालयाकडे तक्रार केली होती़ यावर झालेल्या सुनावणीनंतर संचालकांकडून चार बियाणे विक्री करणा:या कंपन्यांचे परवाने कायम स्वरूपी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत़ बोगस बियाण्याचा फटका शेतक:यांना पुन्हा बसू नये, यासाठी कृषी विभागाकडून काटेकोर अटी व शर्ती बियाणे कंपन्यांना घालून देण्यात आल्या आहेत़ यानुसार बियाण्यांची आवक करण्यापूर्वी ठोक व्यापा:यांना कृषी विभागाला माहिती देऊन बियाणे नमुने तपासणीसाठी द्यावे लागणार आहेत़  येत्या 15 मे नंतर प्रत्यक्ष बियाणे खरेदीला सुरूवात होणार असल्याने कृषी विभागाकडूनही कामकाजाला प्रारंभ होणार आह़े 
कृषी विभागाच्या तपासणी बियाण्यात दोष आढळल्यास संबधित कंपनीच्या बियाणे विक्रीवर बंदी आणण्याचे सांगण्यात आले आह़े दोन लाख 72 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी करण्यात येत़े यासाठी लागणा:या बियाण्याची आवक कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार करण्यात येत़े कृषी विभागाने यंदा 37 हजार 512 क्विंटल बियाण्याची मागणी केली आह़े अद्याप पूर्णक्षमतेने बियाणे उपलब्ध झाले नसले तरी मागणी तेवढय़ाच बियाण्याचा पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े यासोबत कृषी विभागाने 1 लाख 14 हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदवली होती़ यानुसार 99 हजार 100 मेट्रिक टन खत विभागाला प्राप्त झाले आह़े यासोबतच विक्रेत्यांकडे गेल्यावर्षीचे बियाणे पडून असल्याने यंदा खत किंवा बियाणे टंचाई होणार नाही, याची दक्षता घेतली जात आह़े 
कृषी विभागाने कायमस्वरूपी परवाने रद्द केलेल्या चारही बियाणे कंपन्यांपैकी एका कंपनीचे पाच हजार पाकिट ज्वारी बियाणे विक्री होत होती़ यामुळे संबधितांकडून दुस:या ‘लेबल’खाली बियाणे विक्री करण्याची शक्यताही कृषी विभागातील सूत्रांनी बोलून दाखवली असून त्याचीही तपासणी होणा असल्याचे सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: Seed inspection before purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.