खापरजवळ अवैध मद्यसाठी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:08 PM2019-10-16T12:08:50+5:302019-10-16T12:08:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने खापर ता़ अक्कलकुवा गावाजवळ अवैध मद्य वाहून नेणारे वाहन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने खापर ता़ अक्कलकुवा गावाजवळ अवैध मद्य वाहून नेणारे वाहन ताब्यात घेत कारवाई केली़ वाहनातून विदेशी मद्याचा साठा ताब्यात घेण्यात आला आह़े
विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर खापर गावाजवळ भरारी पथकाकडून वाहनांची तपासणी सुरु होती़ दरमयन एमएच 05 जी 2136 या वाहनाची तपासणी केली असता, त्यात परराज्यातील विनापरवाना व्हिस्कीचे 18 बॉक्स आढळून आल़े वाहनासह पथकाने 3 लाख 36 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ पथकाने मनोज मगन चौधरी रा़ खापर ता़ अक्कलकुवा यास ताब्यात घेतले आह़े त्याच्यावर मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कारवाई करण्यात आली आह़े
ही कारवाई नाशिक विभागीय आयुक्त ए़एऩओहोळ व जिल्हा अधिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे मनोज संबोधी, दुय्यम निरीक्षक सुभाष बाविस्कर, दुय्यम निरीक्षक योगेश पाटील, दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यवंशी, हेमंत पाटील, अजय रायते, हर्षल नांद्रे यांनी केली़ पथकाकडून गुजरात हद्दीलगत वाहनांची तपासणी सुरु आह़े