जिल्हा विज्ञान प्रदर्शनातील 12 उपकरणांची राज्यस्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:43 AM2019-02-07T11:43:52+5:302019-02-07T11:43:57+5:30
नंदुरबार : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील 12 उपकरणांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. तीन दिवशीय विज्ञान प्रदर्शनाचा बुधवारी समारोप करण्यात आला. ...
नंदुरबार : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील 12 उपकरणांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. तीन दिवशीय विज्ञान प्रदर्शनाचा बुधवारी समारोप करण्यात आला.
खापर ता.अक्कलकुवा येथील ईरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वी विद्याथ्र्याना जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, ईरा संस्थेचे अध्यक्ष योगेश सोनार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, उपाध्यक्ष जयदेव पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, नीमेश सुर्यवंशी, विस्तार अधिकारी आर.आर.देसले, सहायक शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, ललीत जाट, महेंद्र फटकाळ, कपूरचंद मराठे, योगेश दुशिंग, प्राचार्य डी.बी.अलेक्झांडर आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रदर्शनात प्राथमिक गटात प्रथम अर्णव कुंदन रघुवंशी (एस.ए.मिशन हायस्कूल नंदुरबार), द्वितीय राजनंदनी महाजन (ईरा इंटरनॅशनल स्कूल खापर), तृतीय स्वप्नील परमार (अश्वथामा स्कूल धडगांव), उत्तेजनार्थ फैज परवेज लाखाणी (गुजराथी माध्यमिक विद्यालय नवापूर), आदिवासी राखीव गटात अभिजीत पावरा (कुबेर हायस्कूल म्हसावद), प्राथमिक शिक्षक गटात रामदास पुना पाटील (प्राथमिक आo्रमशाळा कोचरा), अमोल अभिमन्यू कांबळे (अनुदानित आo्रमशाळा गडद ता.नवापूर), राहुल वसंत चकणे (प्राथमिक आo्रमशाळा कोचरा) तर माध्यमिक गटात प्रथम हर्षवर्धन किरण मोहिते (महावीर इंग्लीश स्कूल शहादा), द्वितीय दुर्गेश पाटील (o्रॉफ हायस्कूल नंदुरबार), तृतीय सोहेलखान उवेशखान पठाण (गुजराथी हायस्कूल नवापुर), उत्तेजनार्थ-हिमांशू अशोक सैदाणे (व्ही.के.शाह कनिष्ठ महाविद्यालय शहादा), आदिवासी राखीव गटात अविनाश अनिल पावरा (साने गुरूजी विद्या प्रसारक हायस्कूल शहादा), अध्यापन साहित्य निर्मीतीमध्ये शरद एकनाथ पटेल (माध्यमिक विद्यालय बामखेडा ता.शहादा), लोकसंख्या शिक्षण गटात धोंडीराम महादेव शिंनगर (एकलव्य हायस्कूल नंदुरबार) आदींची निवड झाली असून, ही 12 उपकरणे राज्यस्तरावर जाणार आहेत. यावेळी सुहास नाईक, शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी मार्गदर्शन केले. राजनंदनी महाजन, उर्वशी कलापुरे, विक्रांत पाटील, यश पाटील, ोका करभंजन, आदी विद्याथ्र्यासह ललीत जाट, योगेश सोनार, पुष्पेंद्र रघुवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनाचे परिक्षण डॉ.योगेश दुशिंग, डॉ.सुहास भावसार, डॉ.इंद्रीस पठाण यांनी केले. सुत्रसंचालन अश्विन सोनार, गोटूसिंग वळवी तर आभार मुकेश पाटील यानी मानले.