स्वयंसहायता गट होणार डिजीटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:37 PM2019-12-02T12:37:04+5:302019-12-02T12:37:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नाबार्डच्या महिला स्वयं सहाय्यता गट डिजिटाईजेशन प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे, ...

The Self Help Group will be digital | स्वयंसहायता गट होणार डिजीटल

स्वयंसहायता गट होणार डिजीटल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नाबार्डच्या महिला स्वयं सहाय्यता गट डिजिटाईजेशन प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाल़े जिल्ह्यातील 3 हजार महिला स्वयंसहाय्यता गट डिजीटल होणार आह़े
जिल्हा बँकेत झालेल्या या कार्यक्रमास डीडीसीसी बँकेचे व्यवस्थापक अनिल सिसोदे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, एमएसआरएलएमचे व्यवस्थापक उमेश अहिरराव, लुपिनचे लक्ष्मण खोस, महिला विकास महामंडळाचे संजय संगेकर यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होत़े 
उद्घाटन कार्यक्रमानंतर महिलांसाठी ई-शक्ती कार्यक्रमाची माहिती देणारी कार्यशाळा घेण्यात आली़ नाबार्ड मार्फत लुपिन ह्युमन वेलफेअर अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँक यांच्याकडून जिल्ह्यातील तीन हजार महिला स्वयं सहायता बचत गट डिजीटल करण्यात येणार आह़े
नाबार्ड मार्फत सुरु असलेल्या सर्व योजना या डिजिटल करण्यात आल्या आहेत़ यातील काहींचे काम अंतिम टप्प्यात आले आह़े या उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामीण भागात अर्थसहाय्य वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती नाबार्डचे विकास प्रबंधक प्रमोद पाटील यांनी दिली़ 
जिल्हा बँकेत झालेल्या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात महिला स्वयं सहाय्यता गटासाठी काम करणा:या संस्थांचे प्रतिनिधी, अॅनिमेटर्स व तांत्रिकी मार्गदर्शन करणा:या कर्मचा:यांनी सहभाग घेत महिलांसोबत संवाद साधला़ 
 

Web Title: The Self Help Group will be digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.