जिजामाता औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:52+5:302021-09-27T04:32:52+5:30
जिजामाता औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे ‘फार्मासिस्ट : युवर पार्टनर इन हेल्थ’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, ...
जिजामाता औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे ‘फार्मासिस्ट : युवर पार्टनर इन हेल्थ’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, आसाम आदी राज्यांतील विविध विद्याशाखांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या चर्चासत्रात मार्क शॉर्प ॲण्ड डोह्मे, ऑस्ट्रेलियाचे सिनिअर फार्माको व्हीजीलन्स स्पेशालिस्ट जिनल दर्जी-वाघेला यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे संस्थेच्या अध्यक्ष शोभा मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, सचिव डॉ. अभिजित मोरे यांनी कौतुक केले. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील, समन्वयक प्रा. आय. टी. अन्सारी, प्रा. व्ही. ए. मोरे, प्रा. के. एस. अहमद, प्रा. आर. एन. चौधरी, प्रा. एम. एम. पाटील, प्रा. एस. आर. वळवी, प्रा. एम. के. गावीत, डॉ. जे. पी. गोखवी, प्रा. जे. जे. नाईक यांनी परिश्रम घेतले.