मराठी भाषा व साहित्यावर परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:56 PM2019-08-04T13:56:33+5:302019-08-04T13:56:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त मराठी भाषा व साहित्याचे भवितव्य या विषयावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त मराठी भाषा व साहित्याचे भवितव्य या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता़ परिसंवादात मान्यवरांनी मत मांडत मराठी भाषेचे संवर्धन व्हावे असा सूर प्रकट केला़ प्रसंगी जिल्हाभरातून वाचक व साहित्यप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होत़े
135 वर्षे जुन्या लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयाचा गुरुवारी 136 वा वर्धापन दिन होता़ आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा़डॉ़ पितांबर सरोदे होत़े प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक निंबाजीराव बागुल, प्राचार्य डॉ़ एऩडी़नांद्रे, प्राचार्य डॉ़ संजय शिंदे, वाचनालयाचे संचालक अॅड़केतन शहा, कैलास मराठे उपस्थित होत़े वाचनालयाच्या मुख्य सभागृहात झालेल्या या परिसंवादात निंबाजीराव बागुल यांनी सांगितले की, मराठी भाषा ही चिरंजीव राहिली पाहिजे व शासनाने अभिजात दर्जा देणे आवश्यक आह़े प्राचार्य डॉ़ नांद्रे यांनी सांगितले की, मराठी भाषा ही रक्षणकर्ती आह़े भाषेचा राष्ट्रीय संबध असतो, समूहाला धरुन राहण्यासाठी भाषा आवश्यक असत़े मराठी भाषेला पुढे चांगले दिवस येतील त्यासाठी मराठी भाषेतील साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आह़े
प्राचार्य शिंदे यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आणि तिचा प्रसार करण्यासाठी विज्ञान शाखेतील लेखक निरंजन घाटे, माधुरी शानबाग, जयंत नारळीकर, रेखा बैजल यांनी विज्ञानाचे ग्रंथ मराठी भाषेत आणून मराठी भाषा समृद्ध केली आह़े समाज प्रबोधन आणि परीवर्तनाचे काम मराठी भाषा करत़े मध्ययुगीन कालखंडात हेच कार्य संतांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले आह़े महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेच्या विकासात मोठे कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितल़े प्रा़डॉ़ पितांबर सरोदे यांनी अध्यक्षीय मनोगतात मराठी भाषा आणि वाचन संस्कृती याबाबत मत मांडल़े
प्रास्ताविक वर्षा टेंभेकर यांनी केल़े सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रवीण पाटील यांनी केल़े यशस्वीतेसाठी सुदाम राजपूत, निखील देवकर, सुनील मराठे, सागर वंजारी यांनी परिश्रम घेतल़े