नवीन शैक्षणिक धोरणावर नंदुरबारात चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:28 AM2021-01-18T04:28:32+5:302021-01-18T04:28:32+5:30

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक ...

Seminar on new educational policy in Nandurbar | नवीन शैक्षणिक धोरणावर नंदुरबारात चर्चासत्र

नवीन शैक्षणिक धोरणावर नंदुरबारात चर्चासत्र

Next

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावरील वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.

वेबिनारचे औपचारिक उद्घाटन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील नमूद करण्यात आलेल्या सर्व बाबींची माहिती शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांना होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारचा नक्कीच सर्वांना उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या वेबिनारला डॉ. नेहा बेलसरे, संचालक मिपा, औरंगाबाद, नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक, नाशिक या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. राज्य स्तरावरील शिक्षण तज्ज्ञ निलेश निमकर यांनी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० डॉ. कविता साळुंखे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व प्राथमिक शिक्षण, संदीप वाकचौरे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणची आव्हाने इत्यादी विषयांवर सखोल व विस्तृत मार्गदर्शन केले.

या वेबिनारमध्ये डायट नंदुरबार, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार, आदिवासी विकास प्रकल्प - नंदुरबार व तळोदा, महिला बालविकास प्रकल्प, जिल्हा परिषद नंदुरबार, समाज कल्याण विभाग, अशा विविध विभागांतील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षण प्रेमी यांनी सहभाग नोंदवला.

डायटचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम, बी. आर. रोकडे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वीतेसाठी नोडल अधिकारी प्रवीण चव्हाण, वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, बी. आर. पाटील, डॉ. वनमाला पवार, पंढरीनाथ जाधव, डॉ. संदीप मुळे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Seminar on new educational policy in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.