खविसं चेअरमन निवडीत काँग्रेसमधील चौघांच्या बंडखोरीने सेना-भाजप विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:22 PM2019-07-13T12:22:21+5:302019-07-13T12:22:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुका शेतकरी संघात रिक्त असलेल्या चेअरमनपदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला़  निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीने यश ...

Senate-BJP wins rebel rebel in Congress election | खविसं चेअरमन निवडीत काँग्रेसमधील चौघांच्या बंडखोरीने सेना-भाजप विजयी

खविसं चेअरमन निवडीत काँग्रेसमधील चौघांच्या बंडखोरीने सेना-भाजप विजयी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुका शेतकरी संघात रिक्त असलेल्या चेअरमनपदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला़  निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीने यश प्राप्त करत संघावर वर्चस्व प्रस्थापित केल़े कॉग्रेसच्या चौघांनी बंडखोरी केल्याने शिवसेना-भाजप  आणि काँग्रेसची सदस्य संख्या समान झाली होती़ शेवटी ईश्वरचिठ्ठी काढून सेनेच्या रेखाबाई आमश्या पाडवी यांना विजयी घोषित करण्यात आल़े
अक्कलकुवा शेतकरी संघाचे तत्कालीन चेअरमन दौलतसिंग गुलाबसिंग पाडवी यांच्या मृत्यूनंतर चेअरमनपदाच्या रिक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती़ यांतर्गत शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने बी़बी़अहिरे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून निवड केली होती़ सकाळी 11 वाजेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना व भाजप युतीतर्फे रेखाबाई आमश्या पाडवी तर काँग्रेसतर्फे दौलतसिंग पाडवी, बीजाबाई दौलतसिंग पाडवी या दोघांनी अर्ज दाखल केला होता़ दरम्यान बीजाबाई पाडवी यांनी अर्ज मागे घेतल्याने रेखाबाई पाडवी व दौलतसिंग पाडवी यांच्यात सरळ लढत झाली़ खरेदी विक्री संघाच्या 17 सदस्यांपैकी काँग्रेसचे 12, शिवसेनेचे 3 तर भाजपाचा 1 सदस्य आह़े यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराची निवड निश्चित मानली जात असताना काँग्रसेच्या चार सदस्यांनी बंडखोरी केली़ त्यांनी सेना-भाजप युतीच्या उमेदवाराला पसंती दिल्याने दोघा पक्षांकडे आठ-आठ सदस्य झाले होत़े  पिठासीन अधिकारी अहिरे यांनी ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला़ यानुसार तीन वर्षीय हार्दिक सुनील पवार या बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली़ यात रेखाबाई पाडवी यांचे नाव आल्याने त्यांची चेअरमनपदी निवड झाली़ शिवसेनेला प्रथमच खरेदी विक्री संघात यश मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत होता़ काँग्रेसचे अमृत भटू चौधरी , मन्सूर इब्राहिम मेमन, साजिद अब्दुल जब्बार मक्राणी  आणि अलिम मोहम्मद यार मोहम्मद मक्राणी या चौघांनी बंडखोरी करत शिवसेनेला पसंती दिली़ 
 

Web Title: Senate-BJP wins rebel rebel in Congress election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.