विधानसभेत पाठवा विकास करून दाखवतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:42 PM2019-07-07T12:42:11+5:302019-07-07T12:42:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : विधानसभेत मला पाठवा. समाज व सर्वासाठी कामे करुन कायापालट करुन दाखवेन असे विचार जिल्हा ...

Send to the Legislature to show them by developing | विधानसभेत पाठवा विकास करून दाखवतो

विधानसभेत पाठवा विकास करून दाखवतो

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : विधानसभेत मला पाठवा. समाज व सर्वासाठी कामे करुन कायापालट करुन दाखवेन असे विचार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी व्यक्त केले.  
आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात व भाजपा पक्ष प्रवेशाबाबत विचारविनिमय व चर्चा करण्यासाठी पालिकेच्या   नगरभवनात भरत गावीत यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थक मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी भरत गावीत म्हणाले की राजकारणातील बारकावे हे मी माणिकराव गावीत यांच्या कडूंनच शिकलो. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांनी 700 कोटी रुपयांचा निधी आणून विकासाचे नियोजन करून विकास कामे केलीत. तसे नियोजन नवापुरच्या विकासासाठी करावयाचे असुन त्यासाठी सत्ताधारी पक्ष भाजपात जाऊन काम करावे लागणार आहे असे ते म्हणाले.  
लोकांची साथ मिळत असून ही साथ कायम राहील्यास लोकांच्या सहकार्याने तालुक्यात विकासाची गंगा वाहती करू असे आश्वासन त्यांनी दिले. त्यासाठी मला विधानसभेत पाठवा असे भावनिक आवाहन त्यांनी केले.  यावेळी जेष्ठ नागरीक नकुल गावीत, ईश्वर गावीत, विवेक वळवी, रमेश गावीत, दीपक पाडवी, बालू गावीत, माजी उपनगराध्यक्ष फारुख शाह, बोकलझरचे सरपंच राहुल गावीत, कमलेश पाटील, रसूल पठाण, आर. सी. गावीत व पंचायत समितीचे उपसभापती दिलीप गावीत यांनी भरत गावीत यांच्या समर्थनार्थ विचार व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील, गटनेते गिरिष गावीत, जिल्हा परिषद सदस्या संगिता गावीत, सरपंच राहुल गावीत, नगरसेवक अय्युब बलेसरिया, नगरसेविका मंगला सैन, बबीता वसावे, दर्शन पाटील, माजी नगरसेवक अजय पाटील, रमेशचंद्र राणा, कमलेश मोरे, राजेश गावीत,अजय गावीत, सारिका पाटील, बंटी चंदलानी, चंद्रकांत नगराळे, विजय सैन, जैनु गावीत,   कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गावीत, दिलीप गावीत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 
सुत्रसंचलन प्रकाश गावीत यांनी केले तर पालिकेचे गटनेते गिरीष गावीत यांनी आभार मानले. 
 

Web Title: Send to the Legislature to show them by developing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.