चौघांना सश्रम कारावासची शिक्षा शहादा न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 04:59 PM2019-03-02T16:59:15+5:302019-03-02T16:59:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मारहाण करणा:या करडे येथील चौघांना शहादा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मारहाण करणा:या करडे येथील चौघांना शहादा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
करडे, ता.तळोदा येथील अमित राजेश शेवाळे व जांभोरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर कामाला होता. 15 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमित शेवाळे हा त्याच्या अंगणात उभा असतांना विक्रम वल्लभसिंग जांभोरे, मुकेश विक्रम जांभोरे, बाबुलाल वल्लभसिंग जांभोरे व राकेश बाबुलाल जांभोरे हे त्याच्याजवळ येवून त्याला शिविगाळ करू लागले. मजुरीच्या पैशांवरून सतत भांडण का करतो म्हणून त्याच्यात वाद झाला.
वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. विक्रम जांभोरे, मुकेश जांभोरे, बाबुलाल जांभोरे व राकेश जांभोरे यांनी अमित यास शिविगाळ कूरन मारहाण केली. चाकुने पोटात वार केला. इतरांनी त्यांच्या तावडीतून अमित यास सोडवले. त्यानंतर त्याला बोरद ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आला.
चौघांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरिक्षक युवराज सैंदाणे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात न्या.पी.बी.नाईकवाड यांच्यापुढे हा खटला चालला.