पंचायत राजचा सर्व्हर स्लो झाल्याने इच्छुकांचे उमेदवारी अर्ज सेव्ह होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 01:24 PM2020-12-24T13:24:34+5:302020-12-24T13:24:41+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  राज्यात एकाचवेळी १५ हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी सुरू झाला. यासाठी तयार केलेल्या पंचायत ...

As the server of Panchayat Raj was slow, the candidature application of the aspirants could not be saved | पंचायत राजचा सर्व्हर स्लो झाल्याने इच्छुकांचे उमेदवारी अर्ज सेव्ह होईना

पंचायत राजचा सर्व्हर स्लो झाल्याने इच्छुकांचे उमेदवारी अर्ज सेव्ह होईना

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  राज्यात एकाचवेळी १५ हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी सुरू झाला. यासाठी तयार केलेल्या पंचायत राजच्या वेबसाईटवर अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाल्याने संकेतस्थळ क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी नंदुरबार  ८७ ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करणा-यांनी अर्ज करुनही ते सेव्ह न झाल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज न करता आल्याने  दिवसभर तहसील कार्यालयांमध्ये तयार केलेल्या निवडणूक कक्षांमध्ये शुकशुकाट होता.  
धडगाव तालुक्यातील १६, अक्कलकुवा एक, तळोदा सात, शहादा २७, नंदुरबार २२ तर नवापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीत बुधवारपासून निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे.  यांतर्गत सर्व सहा तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करुन ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची पावती देण्यासाठी कक्ष तयार करण्यात आले आहेत. दोन ग्रामपंचायतींना एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले गेले आहेत.  यात धडगाव तालुक्यासाठी आठ, अक्कलकुवा एक, तळोदा सात, शहादा २०, नंदुरबार १९ तर नवापूर तालुक्यासाठी ८ अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. 
बुधवारी सकाळी या अधिका-यांनी पदभार घेत कक्षात बैठक मारली होती. परंतू सर्व सहा ठिकाणच्या तहसील कार्यालयांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी एकही उमेदवार न आल्याने पहिला दिवस निरंक गेल्याची माहिती आहे. 
दरम्यान गुरुवारी दुस-या दिवशी अर्ज दाखल होण्यास गती मिळण्याची शक्यता आहे. गावोगावी कागदपत्रे मिळवण्यासाठी तसेच दाखले जमा करण्यासाठी माहिती घेतली जात असल्याचे चित्र बुधवारी होते. शासकीय दाखले मिळवण्यासाठी अनेकांनी यापूर्वी अर्ज केले आहेत. हे दाखले मिळावेत यासाठी अनेकांनी तहसील कार्यालयांमध्ये गर्दी केली होती.  काहींकडे दाखले नसल्याने त्यांनी माहिती सुविधा केंद्रांचा आधार घेत अर्ज दाखल केले होते. 
नामनिर्देशनपत्र ऑनलाईन भरवयाचे असल्याने शहरी भागातील इंटनरेट कॅफे आणि सीएससी सेंटर्सवर मंगळवारी रात्रीपासूनच गर्दी झाल्याची माहिती देण्यात आली. ऑनलाईन अर्ज असले तरी त्यासाठी महत्त्वपूर्ण कागदपत्रांच्या नोंदी द्यावयाच्या असल्याने एकासोबत दोन-चार जण सोबत फिरत असल्याने गर्दीत वाढ होत असल्याचे सातत्याने दिसून येत होते. 

शहादा तालुक्यात पॅनल प्रमुख सज्ज 
शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्याच्या आज पहिला दिवस निरंक गेला. इच्छुक उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याने बुधवारी दिवसभरात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. शहादा तहसील कार्यालयाच्या सभागृहात   कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ग्रामपंचायतनिहाय १६ टेबलांची व्यवस्था आहे.  ग्रामपंचायत निहाय  निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली गेली आहे. तालुक्यात ग्रामपंचायात निवडणूकांची चर्चा आहे. खासकरुन राजकारण या विषयावरच चर्चा सुरू आहेत. ग्रामपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थापि  करण्यासाठी पॅनल प्रमुखांनी शड्डू ठोकले आहे.

जिल्ह्यात ८७ ग्रामपंचायतींच्या २७२ प्रभागांमध्ये या निवडणूक होत आहेत. एकूण ६७५ सदस्य पदांच्या जागांसाठी रंगणा-या निवडणूकांसाठी ऑनलाईन अर्ज केले जात आहेत. 
 सकाळपासून अर्ज करणा-यांचे अर्ज भरुन झाल्यानंतर ते सेव्ह होत नसल्याचे दिसून आले. यामुळे एक जण चारपाच वेळा अर्ज भरत होता. 

   नेटवर्क फेल 
सीएससी सेंटर्सवर पंचायत राजच्या वेबसाईटवर एकाचवेळी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाल्याने ही साईट स्लो झाली होती. परिणामी अर्ज करणा-यांना थांबावे लागत होते. धडगाव तालुक्यातील अनेकांना दिवसभरात ऑनलाईन अर्जच करता आलेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्ज भरुन तो सेव्ह होत नसल्याने त्याची पोचपावती निघत नव्हती. परिणामी एकाही ग्रामपंचायतीसाठी बुधवारी दिवसभरात अर्ज दाखल झालेले नाही. 

Web Title: As the server of Panchayat Raj was slow, the candidature application of the aspirants could not be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.