आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पथके स्थापणार -जिल्हाधिकारी; आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:34+5:302021-09-27T04:32:34+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणुकीबाबत संनियंत्रण समितीच्या आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर ...
जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणुकीबाबत संनियंत्रण समितीच्या आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ-टुबे, अधीक्षक अभियंता (विद्युत) अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता वाय. बी. कुळकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या, संपूर्ण निवडणुकीदरम्यान निवडणूक आचारसंहितेचे
कटाक्षाने पालन होईल याकडे लक्ष द्यावे. यावेळी त्यांनी पेड न्यूज समिती, संनियंत्रण समिती, शस्त्र जमा करणे आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. निवडणूकविषयक विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी कार्यान्वित करावी, तसेच आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी दिले.
जिल्ह्यातील ११ निवडणूक विभाग आणि १४ निर्वाचक गणांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी अक्कलकुवा तालुक्यात २ निवडणूक विभाग आणि १ निर्वाचक गण, शहादा ४ विभाग आणि ८ गण, तर नंदुरबार तालुक्यात ५ निवडणूक विभाग व ५ निर्वाचक गण आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील ३४, शहादा १८६ आणि नंदुरबार तालुक्यातील २३६, अशा ४५६ मतदान केंद्रांवर २ लाख ८२ हजार ३८७ मतदार मतदानाचा हक्क
बजावतील. यापैकी १ लाख ३९ हजार ५४८ स्त्री आणि १ लाख ४२ हजार ८३९ पुरुष मतदार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.