लोकअदालतीत 22 प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:06 PM2019-06-24T12:06:56+5:302019-06-24T12:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होत़े यात शहरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होत़े यात शहरातील कॅनरा बँक शाखेच्या 84 थकबाकीदारांना आमंत्रित करण्यात आले होत़े त्यापैकी 22 कर्जदारांच्या प्रकरणांचा निपटारा झाला़
प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत जिल्हा न्यायाधीश ए. एस. भागवत, न्यायाधीश एस. डी. मलिये, एस. ए. विराणी, एन.बी. पाटील, अॅड़ सीमा खत्री, अॅड़ एस. के. पाटील, अॅड़ एम. जी. परदेशी उपस्थित होते.
थकीत कर्जदारांना कर्जापासून मुक्ती मिळावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता़ कॅनरा बँकेच्या 84 थकबाकीदारांनी यात सहभाग नोंदवला़ चर्चेअंती 22 जण कजर्मुक्त झाले तर उर्वरित 62 जणांना 13 जुलै रोजी होणा:या राष्ट्रीय लोक अदालतीत पुन्हा बोलावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ यावेळी प्राधिकरणतर्फे कजर्दारांचे समुपदेशन करण्यात आल़े बँकेचे औरंगाबाद विभागीय प्रबंधक अविनाश पुरोहित, कृषी प्रबंधक निलेश जाधव, वसुली अधिकारी प्रशांत कुमार, प्रबंधक अभिकुमार चौधरी, कार्यकारी प्रबंधक अवी जोहरी, सहाय्यक रमेश केथावत, गणेश कोळी यांनी बँकेच्या थकबाकीदारांसोबत चर्चा केली़