किडणीतून काढला सात सेंटीमीटरचा खडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:24 PM2017-11-05T13:24:40+5:302017-11-05T13:24:40+5:30
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना : मोफत उपचारामुळे रुग्णांमध्ये समाधान
Next
ठळक मुद्देविविध आजारांवर उपचार
ल कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील पटेल सजिर्कल हॉस्पीटलमध्ये रुग्णाच्या किडणीतून तब्बल सात सेंटीमीटरचा खडा काढण्यात आला़ विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णाला यासाठी एक रुपयाही मोजावा लागला नाही़नंदुरबार येथील पटेल सजिर्कल हॉस्पीटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आतार्पयत 25 शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत़ जिल्हा सामान्य रुग्णालयानंतर शहरातील केवळ पटेल सजिर्कल येथेच या योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार करण्यात येत आह़े या योजनेअंतर्गत कोठली येथे घेण्यात आलेल्या कॅम्पमध्ये कोकणीपाडत्त येथील प्रमिला चौधरी यांच्या किडणीत तब्बल सात सेंटीमीटरचा खडा असल्याचे निदर्शनास आले होत़े सर्वसाधारपणे दोन ते तीन सेंटीमीटर्पयत आकाराचा खडा हा किडणीत आढळू शकतो़ या शस्त्रक्रीयेसाठी साधारणत 90 हजार ते एक लाखांर्पयत खर्च अपेक्षीत असतो़ परंतु जन आरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली़ लाभार्थी कोण?..केशरी व पिवळ कार्डधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात़ त्या अंतर्गत ते पोटाचे गंभीर आजार, मुतखडय़ाच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रीया,प्रोस्टेट ग्रंथीच्या शस्त्रक्रीया, स्त्रीयांना होणा:या आजारांच्या निवडक शस्त्रक्रीया, प्लॅस्टीक सजर्री आदींवर उपचार घेऊ शकतात़ यासाठी केशरी किंव पिवळे कार्ड व ओळखपत्र आदींची पूर्तता करणे आवश्यक असत़ेगेल्या दोन महिन्यांपासून पटेल सजिर्कल हॉस्पीटलमध्ये जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्ण उपचार घेत आहेत़ लाभाथ्र्याना मोफत उपचार करता येत असल्याने रुग्णांची संख्यादेखील वाढत आह़े