विवाहितेला जाळल्याच्या आरोपातून सात जण निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:01 PM2020-01-12T12:01:53+5:302020-01-12T12:01:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतीला मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करून तिला जाळल्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पतीला मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करून तिला जाळल्याच्या आरोपातील सात संशयीतांना शहादा न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
शहादा येथील शितल हेमंत सोनवणे या विवाहितेला शहादा येथील विष्णूनगर मध्ये राहणारी सासरची मंडळी ५० हजार रुपयांसाठी छळ करीत होते. या छळातूनच आपल्याला रॉकेल टाकून सासरच्या मंडळींनी जाळल्याची फिर्याद महिलेने दिली होती. त्यावरून पती हेमंत रामचंद्र सोनवणे, रामचंद्र सुरजन सोनवणे, विमलबाई रामचंद्र सोनवणे, मनिष रामचंद्र सोनवणे, शुभांगी रामचंद्र सोनवणे, दिनेश रामचंद्र सोनवणे व संगिता करन बागुल यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत्यूपूर्वी तीन जबाब नोंदविण्यात आले होते.
शहादा न्यायालयात फौजदार एकनाथ पाटील यांनी दाखल केले होते. न्या.व्ही.एम.पठाडे यांच्या न्यायालयापुढे कामकाज चालले. १४ जणांच्या साक्षी तपासल्या. साक्षी, पुरावे लक्षात घेता न्या.पठाडे यांनी सर्वच सातही संशयीतांची निर्दोष मुक्तता केली. संशयीतांतर्फे अॅड.अमोलकुमार गुलाले यांनी काम पाहिले.