तळोद्यात साडेसात किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:02 PM2018-05-22T13:02:03+5:302018-05-22T13:02:03+5:30
पालिकेची कारवाई : 30 दुकानांची केली तपासणी, मुख्याधिका:यांचा पुढाकार
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 22 : तळोदा पालिकेकडून सोमवारी शहरातील मेनरोड परिसरातील 30 दुकानांची तपासणी करुन त्यांच्याकडून सुमारे साडेसात किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या़ त्यानंतर त्या नष्ट करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली़ पालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली़
राज्यभरात गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक पिशव्या तसेच ठराविक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आह़े त्यानूसार सोमवारी पालिकेकडून प्लॅस्टिक पिशव्या तसेच बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक वस्तूंची जप्ती मोहिम हाती घेण्यात आली़ पालिका आस्थापना प्रमुख राजेंद्र सैंदाणे यांच्यासह सुरेंद्र वळवी, सुरेश रामराजे, राजू यांच्या पथकाने ही कारवाई केली़ यापूर्वी शहरातील सर्व दुकानदार, व्यावसायिकांना 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करुन नये केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला होता़ तसेच असलेला साठा त्वरीत संपवावा व पुन्हा मालाची आयात करु नये असेही सांगण्यात आले होत़े तसेच सूचना करुनही ज्या व्यापारी तसेच दुकानदारांकडे बंदी घालण्यात आलेला प्लॅस्टिकचा माल आढळून येईल अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होत़े
त्यानुसार सोमवारी पालिकेकडून कारवाई करण्यात आली़ दरम्यान या मोहिमेसाठी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी पुढाकार घेतल्याने पर्यावरणप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े
या परिसरातील बहुतेक व्यापारी गुजरात तसेच जळगावातून प्लॅस्टिकच्या मालाची आयात करीत असतात़ राज्या शासनाकडून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर अनेक व्यापा:यांनी मालाची आयात थांबवली होती़ परंतु काहींकडून बंदीनंतरसुध्दा प्लॅस्टिकच्या पिशव्यांची आयात करण्यातच येत होती़
त्यामुळे पालिका प्रशासनाकडून अशा व्यापा:यांच्या दुकानाची तपासणी करण्यात आली़ तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आह़े