सातपुडय़ाला लागले होलिकोत्सवाचे ‘वेध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:15 PM2018-02-22T13:15:51+5:302018-02-22T13:15:57+5:30

Seven-Purpose Launches 'Obscurity' of Holikotsav | सातपुडय़ाला लागले होलिकोत्सवाचे ‘वेध’

सातपुडय़ाला लागले होलिकोत्सवाचे ‘वेध’

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 22 : सातपुडय़ाला पारंपरिक होलिकोत्सवाचे वेध लागले आहेत़ डाब ता़ अक्कलकुवा (मोरीराही) येथे सोमवारी पहाटे होळी पेटवल्यानंतर जिल्ह्यात होलिकोत्सवाला सुरूवात होणार आह़े होळीच्या पाश्र्वभूमीवर आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत़  
सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील आदिवासी देवांची भूमी डाब (मोरीराही) येथे पेटणा:या देवहोळीची तयारी सुरू झाली आह़े गुरूवारी सकाळी होळीसाठी लागणारा सर्वात उंच बांबू शोधण्यासाठी डाब येथील 10 युवक रवाना होतील़ पाच दिवस पाळणी व घालून दिलेल्या नियमांचे पालन करून 25 रोजी मध्यरात्री ते बांबू घेऊन येणार आहेत़ डाब येथे पेटलेल्या होळीनंतर सोमवारी डाब गावातील होळी पेटवण्यात येईल़ त्यानंतर धडगाव, अक्कलकुवा तालुक्याच्या विविध भागात होळी पेटवण्यात येणार आह़े होळीच्या पाश्र्वभूमीवर दागिने, घुंगरू आणि इतर साहित्याची मोठी विक्री होत असत़े यासाठी कारागिर धडगाव परिसरात दाखल झाले आहेत़  त्यांच्याकडून होणा:या खरेदीमुळे बाजारात उलाढालीलाही सुरूवात झाली आह़े डाब (मोरीराही) येथील होळी ही देवाने ठरवून दिलेली पहिली होळी अशी धारणा आदिवासी बांधवांमध्ये आह़े या होळीसाठी सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील नागरिक डाब येथे रविवारपासून दाखल होणार आहेत़ याहामोगी देवीचे जन्मठिकाण असलेल्या देवगाई येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असत़े  डाबच्या देवहोळीनंतर वालंबा, तोडीकुंड, काठी यासह ठिकठिकाणी होळी पेटणार आह़े यात जागोजागी मोरखी, बुध्या, बावा, धानका, डोखा हे गेर नृत्य आदिवासींकडून केले जाणार आह़े सातपुडय़ात होलिकोत्सवाला आठवडा शिल्लक असल्याने मोलगी, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, तोरणमाळ येथील बाजारात गर्दी वाढत आह़े होळी पेटल्यानंतर त्या-त्याठिकाणी मेलादे होणार आहेत़ होळीपूर्वी भोंग:या बाजाराचे आयोजन करण्यात येणार असल्याने धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात सध्या ग्रामपंचायतींच्या नियोजन बैठका सुरू आहेत़ मोलगी, धडगाव, अक्कलकुवा आणि म्हसावद पोलीस ठाण्याकडूनही भोंग:या बाजार व होळीसाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन सुरू आह़े  

Web Title: Seven-Purpose Launches 'Obscurity' of Holikotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.