अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी सात संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:06 PM2018-04-28T13:06:14+5:302018-04-28T13:06:14+5:30
पीटांतर्गत शहाद्यात कारवाई : आतार्पयत 15 जण ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली शुक्रवारी पोलीसांनी पुन्हा सात संशयितांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने 1 मे र्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ या प्रकरणी आतार्पयत अटक झालेल्या संशयितांची संख्या 15 वर पोहोचली असून संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आह़े
जानेवारी 2017 मध्ये शहरातील भाजीमार्केट परिसरात चालणा:या अनधिकृत वेश्या व्यवसायावर रेस्क्यू फाउंडेशन पुणे व शहादा पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली होती़ पिटा व पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या या गुन्ह्यात पोलीसांनी आतार्पयत 15 जणांना अटक केली असून आठ महिला व सात पुरूषांचा समावेश आह़े याप्रकरणी शुक्रवारी पोलीसांनी सहा महिला आणि एका पुरूषाला अटक केली़ यात पूजा शिवा ठाकरे रा़ शहादा, कमलबाई भटू महिरे रा़ मलोणी, रेणू ऊर्फ राणी कृष्णा पासवान, रा़ गांधीनगर, शेवंती ऊर्फ बेबी बाबू शेख रा़ शहादा, बेबी ऊर्फ लक्ष्मी जगन्नाथ पाटील शहादा, आणि गोकूळ शेखर चव्हाण रा़ शहादा यास ताब्यात घेतल़े
पोलीसांनी गेल्यावर्षी ताब्यात घेतलेल्या महिलांची सुधारगृहात रवानगी केली होती़ सर्व संशयितांना जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़बी़नायकवाड यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, त्यांना 1 मे र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील करत आहेत़ याप्रकरणी प्रारंभी तीन महिलांना अटक करण्यात आली होती़ त्यांची जामिनीवर मुक्तता करण्यात आली होती़ जानेवारी 2017 रोजी 69 महिला आणि अल्पवयीन युवतींची सुटका करण्यात आली होती़ राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातूून या महिला याठिकाणी आणल्या गेल्या होत्या़ याप्रकरणी सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आह़े