सात हजार कुटूंब अजूनही शौचालयाविना

By admin | Published: April 6, 2017 01:32 PM2017-04-06T13:32:58+5:302017-04-06T13:32:58+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिका हद्दीतील सात हजार 285 कुटूंबांकडे शौचालय नसल्याने ते अजूनही उघडय़ावर शौचास जात असल्याचे सव्र्हेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे.

Seven thousand families are still without toilets | सात हजार कुटूंब अजूनही शौचालयाविना

सात हजार कुटूंब अजूनही शौचालयाविना

Next

 नंदुरबार जिल्हा : चार पालिका हद्दीतील स्थिती

नंदुरबार,दि.6- जिल्ह्यातील चारही पालिका हद्दीतील सात हजार 285 कुटूंबांकडे शौचालय नसल्याने ते अजूनही उघडय़ावर शौचास जात असल्याचे सव्र्हेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे.  
नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर या पालिका आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार शौचालयांची सुविधा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांची एकुण संख्या 15 हजार 529 होती. त्यापैकी सहा हजार 518 कुटूंबे उघडय़ावर शौचास जात होती. त्यानंतर केंद्र शासन, राज्य शासनाने स्वच्छता आणि निर्मलग्राम अभियान राबवून स्वच्छतेविषयी जनजागृती केली. त्याचा परिणाम म्हणून नंदुरबार नगर पालिका ही संपुर्ण हगणदारीमुक्त पालिका म्हणून शासनाने घोषीत केली. असे असले तरी इतर तीन पालिकांमधून सात हजार 285 कुटुंब अजूनही उघडय़ावर शौचास जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या चारही नगरपालिका क्षेत्रांमध्ये पाच हजार 778 शौचालयांची कामे पुर्ण झाली आहेत. 

Web Title: Seven thousand families are still without toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.