शहाद्यात मिरवणुकीच्या वादातून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:49 PM2018-09-25T12:49:11+5:302018-09-25T12:49:14+5:30
शहाद्यातील घटना : पाच जणांवर गुन्हा दाखल
नंदुरबार : विसजर्न मिरवणुकीत गणेश मंडळ पुढे नेण्याच्या वादातून पाच जणांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना शहादा येथील गांधी पुतळ्याजवळ घडली. याप्रकरणी मारहाण व अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहाद्यात विसजर्न मिरवणुका सुरू असतांना काही मंडळे गांधी पुतळ्याजवळ आली. तेथे कार्तिक दिलीप नाईक व दिलीप रामदास चौधरी यांच्या मंडळात मिरवणूक पुढे नेण्यावरून वाद झाला. चौधरी यांनी आमच्या मंडळाला पुढे जावू द्या म्हणून सांगितले, परंतु नाईक यांनी लाईननुसारच मंडळाच्या मिरवणुका पुढे जातील असे बजावले. त्यावरून दोघा मंडळाच्या कार्यकत्र्यामध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. कार्तिक दिलीप नाईक यांच्या फिर्यादीनुसार दिलीप रामदास चौधरी, प्रकाश रामदास चौधरी, हितेंद्र दिलीप चौधरी, महेंद्र दिलीप चौधरी, मनोज चौधरी सर्व रा.शहादा यांनी कार्तिक नाईक यांना बेदम मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केली. याबाबत शहादा पोलिसात पाचही जणांविरुद्ध मारहाण व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील करीत आहे. शहाद्यात पाचव्या, सातव्या, नवव्या व अकराव्या दिवशी गणेश विसजर्न मिरवणुका काढण्यात आल्या. सर्वत्र शांततेत व उत्साहात या मिरवणुका निघाल्या, परंतु या किरकोळ कारणावरून यंदा गणेशोत्सवातील एकमेव गुन्हा दाखल होण्याचे कारण शहाद्यात घडले. पोलिसांचे नियोजन चांगले राहिले.