शहादा : 68 लाखांची दारु म्हसावद फाटय़ाजवळ पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:39 PM2017-12-26T12:39:49+5:302017-12-26T12:39:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मध्यप्रदेशातून धडगांवकडे अवैधरित्या विना परवाना जाणारी सुमारे 68 लाखांची दारु रविवारी रात्री म्हसावद फाटय़ाजवळ पकडली. मुंबई व नंदुरबार राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली़ याप्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात असून न्यायालयाने त्यांना 28 डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
31 डिसेंबर तसेच नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन विभागाच्या मुंबई व नंदुरबार शाखेने रविवारी शहाद्यात मोठी कारवाई केली. मध्यप्रदेशातून मोठय़ा प्रमाणात बनावट, विना परवाना दारुची वाहतूक केली जाते. याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मुंबई व नंदुरबार विभागाच्या पथकाने रविवारी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास म्हसावद फाटय़ाजवळ सापळा रचून ट्रक (क्र. एमएच 09 एचएफ 2891) ताब्यात घेतला.
ट्रकची तपासणी केली असता त्यांत ‘बॉम्बे स्पेशल व्हिस्की’ व ‘लेमाँन्ट’ बियरचे 767 बाँक्स आढळुन आला. या ट्रकसह 55 लाख 36 हजार 740 रूपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेतला. कारवाई मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक अशोक तारू, गौतम खंडागळे, प्रदीप अवचार, विकास सावंत, तसेच नंदुरबार भरारी पथकाचे निरीक्षक अविनाश घरत, एस़क़े कांडे, हंसराज चौधरी, राहुल सावळे, अजय रायते, धनराज पाटील यांनी केली.
या प्रकरणात अशोक बालमुकुंद द्विवेदी व बलबिरसिंग महिपतसिंग कुशावह दोघे (रा. भोपाळ,मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात येऊन शहादा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम़बी़ सोनटक्के यांच्या समोर हजर करण्यात आल़े दोघांना 28 डिसेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.