शहादा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:40 PM2020-03-23T12:40:23+5:302020-03-23T12:40:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात जनतेने १०० टक्के प्रतिसाद देऊन कडकडीत बंद ...

 Shahada closed tightly | शहादा कडकडीत बंद

शहादा कडकडीत बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात जनतेने १०० टक्के प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला. शहरातील बाजारपेठ गल्ली ते कॉलनी, मुख्य परिसर, चौकाचौकात व रस्त्यांवर शुकशुकाट होता. कोरोनावर मात करण्यासाठी शहाद्यातील व्यापाऱ्यांनी छोटे-मोठे सर्व व्यवहार दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिल्याने प्रथमच शहर पूर्णपणे बंद झाले होते़
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहारतील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवून तसेच विविध कार्यक्रम थांबवून नागरिकांनी घरातच थांबून कोरोना व्हायरसला थोपवण्यात योगदान दिले़ पेपर विक्रेते, दूध वाटप करणारे आदी आवश्यक सेवा देणाऱ्यांनी सकाळी सात वाजेपूर्वीच कामे आटोपून घरी परतले. शहरातील मुख्य परिसर, बसस्थानक, गांधी पुतळा, मेनरोड, भाजी मार्केट, दोंडाईचा रोड, खेतिया रोड, डोंगरगाव रोड, स्वामी समर्थ चौक, पटेल रेसिडेन्सी चौक, स्टेट बँक चौक, नगरपालिका परिसर, बाजारपेठ, कॉलनी, गल्लीतील चौकाचौकात शुकशुकाट होता. शहरातील सर्व नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले होते. रुग्णालय, मेडिकल यासह अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यापारी संपूर्ण प्रतिष्ठान बंद असल्याने मुख्य रस्त्यांसह वसाहतींमधील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते.
प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्यासह महसूल विभाग, पालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागात गस्त घालून नागरिकांनी जनता कर्फ्यु दरम्यान घरातच थांबावे, असे आवाहन करीत होते. या आवाहनाला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील बसस्थानक परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. शहादा आगारातून रविवारी एकही बसफेरी झाली नाही.

 


सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात लेवा पाटीदार गुजर समाजातील विद्यार्थी, मुले, मुली किंवा बॅचलर असतील व ते काही कारणास्तव गावी जाऊ शकत नसतील व पुण्यात अडकले असतील त्यांना जर कुठल्याही प्रकारची पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अडचण येत असेल तर केदारेश्वर प्रतिष्ठानच्या ९४२०७९९०४१, ८२३७८७४५३५, ९७६२४८६६८३, ९८२३४६४७०३, ७६२०००४०२०, ९९२३१२१७२५ या भ्रमणध्वनी नंबरवर संपर्क करावा. शक्य ती मदत केदारेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला त्वरित करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.


सकाळी सात वाजेपासून शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाने घरी जाण्याचे आवाहन केले. पोलिसांतर्र्फेे सूचना देताना काही ठिकाणी नागरिकांना मारहाण झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. पोलिसांच्या या कृत्यात माध्यमांचे प्रतिनिधीही सुटले नाही. वार्तांकन करणाºया माध्यम प्रतिनिधींशीही पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरल्याची माहिती आहे़

Web Title:  Shahada closed tightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.