शहादा चालक प्रशिक्षण केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:52 PM2018-08-10T12:52:04+5:302018-08-10T12:52:17+5:30

Shahada Driver Training Center awaiting inauguration | शहादा चालक प्रशिक्षण केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

शहादा चालक प्रशिक्षण केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खान्देशातील पहिले चालक प्रशिक्षण केंद्र शहादा आगारात सुरु करण्यात येणार आह़े परंतु सर्व सोयी-सुविधांची व्यवस्था होऊनही केवळ उद्घाटनाअभावी  हे केंद्र सुरु होण्यास प्रतीक्षा करावी लागत आह़े सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटनाला विलंब होतोय़
एसटी महामंडळाकडून एसटी म्हणजे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील युवकांसाठी चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आलेले आह़े राज्यात यवतमाळ येथे हे केंद्र सुरु झाले असून त्यानंतर दुसरे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा:या नंदुरबारातील शहादा तालुक्यात हे चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचे नियोजन होत़े त्यासाठी शहादा बस आगाराच्या इमारतीत या केंद्राची उभारणी करण्यात आलेली आह़े 
या केंद्रात अनुसूचित जमातीच्या  युवकांना चालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आह़े त्याच प्रमाणे त्यांच्यासाठी येथे निवासाची सोयसुध्दा उपलब्ध होणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आलेली आह़े 
राज्यभरातील युवकांना आधार
अनुसूचित जमातीतील युवकांना कौशल्य विकासाची संधी मिळावी, त्यांना रोजगाराचे साधन मिळावे यासाठी एसटी महामंडळाकडून चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची योजना आखली गेली़ यासाठी राज्यातील आदिवासी बहुसंख्य असलेले जिल्हे निवडण्यात आले आहेत़ 
यात, यवतमाळ व नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आह़े राज्यभरातील अनुसूचित जमातीमधील युवक या चालक प्रशिक्षण केंद्रात निवासी पध्दतीने प्रवेश घेऊन चालकाचे प्रशिक्षण घेऊ शकतात़ त्यामुळे राज्यभरातील युवकांना या चालक प्रशिक्षण केंद्रांचा आधार वाटत आह़े त्यामुळे लवकरात           लवकर याचे उद्घाटन करुन चालक प्रशिक्षण केंद्र सुरु कण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आह़े
केंद्र कायमस्वरुपी कार्यान्वित
चालक प्रशिक्षण केंद्र हे प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आह़े परंतु हे केंद्र कायमस्वरुपी कार्यान्वित रहावे अशी मागणी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीमधील युवकांकडून करण्यात येत आह़े विनामुल्य हे केंद्र चालविण्यात येणार असल्याने याचा मोठय़ा प्रमाणावर फायदा आदिवासी युवकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े हे चालक प्रशिक्षण केंद्र निवासी असल्याने साहजिकच जिल्ह्यासह राज्यभरातील युवकांची या ठिकाणी सोय होणार आह़े शहादा बस आगारातील या केंद्रात सर्व सोयी-सुविधांची पूर्तता झालेली आह़े 
15 ऑगस्ट पूर्वीचा होता मुहूर्त
15 ऑगस्टपूर्वी हे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले होत़े त्यानुसार त्याचे कामही पूर्ण झालेले आहेत़ परंतु मंत्री दिवाकर रावते यांची तारीख मिळत नसल्याने या केंद्राचे भिजत घोंगडे कायम असल्याची माहिती आह़े परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाकडून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आह़े तारीख मिळाल्यास लगोलग या केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम आवरण्यात येणार आह़े यासाठी धुळे एसटी विभागाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आह़े
चालक प्रशिक्षण केंद्र सुरु व्हावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही उदासिन दिसून येत आह़े लोकप्रतिनिधींनी याबाबत पुढाकार घेतल्यास सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आह़े    

Web Title: Shahada Driver Training Center awaiting inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.