अनधिकृत बॅनरविरोधात शहादा पालिका कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:00 PM2018-04-30T13:00:39+5:302018-04-30T13:00:39+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 30 : बॅनर, पोस्टर, होर्डीग, ङोंडे लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने दिला आहे.
प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, डॉ.उल्हास देवरे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी या वेळी प्रशासनाची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची 1 मेपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे साताळकर यांनी सांगितले. 1 मे 2018 पासून ङोंडे, बॅनर, होर्डीग लावण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक असून विनापरवानगी होर्डीग, बॅनर लावल्यास कारवाई केली जाईल. तसेच पालिकेची परवानगी घेण्यापूर्वी ज्या जागेवर पोस्टर लावायचे असेल त्या जागा मालकाचा नाहरकत दाखला घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी बॅनर लावावेत व कार्यक्रमानंतर ते लगेच काढून घ्यावे अन्यथा पोलीस व पालिका प्रशासन ते काढून घेईल व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक शुक्ल यांनी सांगितले. या वेळी जि.प. सदस्य अभिजित पाटील, अरविंद कुवर, अशोक बागूल, बापू जगदेव, ईश्वर पाटील, के.डी. पाटील, लोटन धोबी, सुनील गायकवाड, मनलेश जायसवाल, यशवंत चौधरी, जितेंद्र जमदाळे, रमाशंकर माळी आदी उपस्थित होते.