शहादा पालिका नगरसेवकांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:24 PM2018-01-05T12:24:27+5:302018-01-05T12:24:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : खोटे व बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दोन तर दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याप्रकरणी एक अशा तीन नगरसेवकांच्या विरोधात जिल्हाधिका:यांकडे अपात्रतेची तक्रार दाखल झाल्याने शहाद्याच्या या तिन्ही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या तक्रारींवर गुरुवारी होणारी सुनावणी पुढे ढकलल्याने याप्रकरणी काय निर्णय लागतो याकडे लक्ष लागले आहे.
शहादा नगरपालिकेची मागीलवर्षी निवडणूक झाली होती. नगराध्यक्षपदी भाजपचे मोतीलाल पाटील विजयी झाले होते तर काँग्रेसचे 11, भाजपचे 10, एमआयएमचे चार आणि राष्ट्रवादी व अपक्ष प्रत्येकी एक याप्रमाणे संख्याबळ होते. निवडणुकीच्या एक वर्षानंतर तीन सदस्यांविरोधात जिल्हाधिका:यांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याने पालिका वतरुळात खळबळ उडाली आहे. एमआयएमचे नगरसेवक वाहीद रशीद पिंजारी यांच्याविरोधात माजी नगरसेवक शेख मेहमूद शेख अहेमद यांनी तर भाजपच्या नगरसेविका सईदा साजीद अन्सारी यांच्याविरोधात माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांनी जिल्हाधिका:यांकडे तक्रारी केल्या आहेत. दोघाही नगरसेवकांवर खोटे व बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार आहे तर नगरसेवक मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक शेख इकबाल शेख सलीम यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिका:यांकडे केली आहे. एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपच्या तिघाही नगरसेवकांविरोधात अपात्रतेच्या तक्रारी दाखल झाल्याने पालिका वतरुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी जिल्हाधिका:यांकडे सुनावणी होणार होती. परंतु जिल्हाधिकारी बाहेरगावी असल्याने सुनावणी होऊ शकली नाही. नगरसेवक अपात्रतेप्रकरणी काय निर्णय होतो याकडे शहादेकरांचे लक्ष लागून आहे.