शहादा-पुणे शिवशाही बससेवेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:59 PM2018-04-05T12:59:34+5:302018-04-05T12:59:34+5:30
वातानुकूलीत सेवा : स्लीपर कोचमुळे सुलभ प्रवास
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 5 : धुळे विभागाअंतर्गत गुरुवारपासून शहादा ते पुणे ही वातानुकूलीत स्लीपर कोच शिवशाही बससेवा सुरु करण्यात आली आह़े शहादा आगारासाठी दोन खाजगी शिवशाही बसेस् देण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख योगेश लिंम्बायत यांनी दिली़
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे विभागांतर्गत शहादा आगाराला ही वातानुकूलीत शिवशाही बस उपलब्ध झाली आह़े यामुळे शहादेकरांना पुणे जाणे अधिक सोयीचे होणार आह़े गुरुवारी रात्री आठ वाजता आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या उपस्थितीत या बससेवेचे उद्घाटन झाल़े राज्यातील केवळ पाच आगारांनाच या बसेस दिल्या आहेत़
पाच पैकी धुळे विभागाअंतर्गत शहादा आगारास दोन बसेस देण्यात आल्या आहेत़ शहादा येथून रात्री नऊ वाजता व पुणे येथून रात्री साडेनऊ वाजता ही बस सुटेल़ यासाठी एकीकडून 986 रुपये प्रवासी भाडे आकारण्यात येणार आह़े
उद्घाटन वेळी धुळे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ, विभागीय वाहतुक अधिकारी किशोर महाजन, तहसीलदार मनोज खैरनार, यंत्र अभियंत्रा किशोर सोमवंशी, शहादा आगारप्रमुख योगेश लिंम्बायत, स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ़किशोर पाटील, नगरसेविका रिमा पवार, नगरसेवक संजय साठे, योगिता वाल्हे, संतोष वाल्हे, दिनेश खंडेलवाल, क़ेएम़ पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक एस़एम़शेख, शहादा आगाराच्या युनियन संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होत़े सूत्रसंचालन व आभार संजय कुलकर्णी यांनी केल़े