शहाद्यात उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे ट्रॅक्टर चालकांसाठी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:16 PM2018-02-22T13:16:54+5:302018-02-22T13:16:59+5:30
ऑनलाईन लोकमत
प्रकाशा, दि 22 : नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रकाशा बसस्थानक परिसरात ट्रॅक्टर चालकांसाठी शिबिर घेण्यात आले. यात वाहनचालविताना घ्यावयाची काळजी, अपघात होवू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत पाटील व जिगअेश गायकवाड यांनी माहिती ट्रॅक्टर व ट्रॉलीला रेडियम पट्टय़ा लावून माहिती पुस्तिकेचे वाटप केले.
शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील विविध भागातून शेतकरी ट्रॅक्टरद्वारे माल विक्रीसाठी आणत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत पाटील, जिगअेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, व्यापारी प्रकाश जैन आदींसह शेतकरी उपस्थित होते.
या वेळी सागर पाटील यांनी वाहनचालकांना वाहन वेगात चालविणे म्हणजे चांगला चालक नव्हे तर अवजड वाहनाचे भान ठेवून वाहनचालविणे, ट्रॅक्टर ट्रॉली घेवून जाताना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नये, आपल्या चुकीमुळे दुस:यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे अवाहन केले. त्याचप्रमाणे दुचाकी चालविताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा. तसेच ट्रॅक्टर व ट्रॉलीला नेहमी रेडियम पट्टय़ा राहू द्या, पुढच्या बाजूला पांढ:या रंगाची, मागच्या बाजुला लाल रंगाची पट्टी वाहनाच्या बाजुला पिवळ्या रंगाची पट्टी लावाण्याचे आवाहन केले.