शहादा तालुका ग्रा़पं पोटनिवडणूकीसाठी उमेदवार मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:11 PM2018-05-15T13:11:57+5:302018-05-15T13:11:57+5:30
अनुत्साह : शहादा तालुक्यात केवळ तीन अर्ज दाखल
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 15 : तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता़ यानुसार 18 ग्रामपंचायतीच्या 20 जागांसाठी अर्ज मागण्यात आले होत़े मात्र 12 मे अंतिम मुदतीअखेर केवळ दोन ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी तीन अर्ज आले असून 17 ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येणार आह़े
शहादा तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक आयोगाने चौथ्यांदा अधिसूचना काढली होती़ यानुसार आचारसंहिता लागू झाली होती़ पाडळदा बुद्रुक, कमरावद, बिलाडी त़सा, बुपकरी, श्रीखेड, भोरखेडा, दामळदा, मलोणी, कुढावद, सावळदा, कु:हावद त़सा, ओझर्टा, परिवर्धे, बुडीगव्हाण, अलखेड, काथर्दे दिगर, शिरूड दिगर व भूते आकसपूर या ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी नामनिर्देशन मागवण्यात आली होती़ शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत केवळ भुते आकसपूर येथील 1 जागेसाठी 2 अर्ज तर पाडळदा बुदद्रुक येथे 1 जागेसाठी 1 अर्ज प्राप्त झाला आह़े बुधवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आह़े शहादा तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम दर सहा महिन्यांनी जाहिर करण्यात येत आह़े यासाठी निवडणूक निर्णय अधिका:यांची नियुक्ती करण्यात आली होती़ मात्र गेल्या सात दिवसात ूकेवळ 2 अर्ज प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़ेनंदुरबार जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतींच्या 36 जागांसाठीचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता़ यापैकी शनिवारी अंतिम मुदतीत शहादा तालुक्यातील पाडळदा बुद्रुक आणि भूतेआकसपूर, नवापूर तालुक्यातील ढोंग 1, नागगीपाडा 2, तळोदा तालुक्यातील सोमावल खुर्द 1, नंदुरबार तालुक्यातील भोणे 2, वाघशेपा 2, कोठडा 1, धिरजगाव 1 तर अक्कलकुवा तालुक्यातील वडीबार ग्रामपंचायतीच्या एका रिक्त पदासाठी केवळ 1 अर्ज दाखल झाला आह़े 32 पैकी केवळ 13 ग्रामपंचायतींतून अर्ज दाखल झाल्याने उर्वरित 23 गावांमधील रिक्त पदासांठी पुन्हा अधिसूचना काढण्यात येईल़ येत्या सप्टेंबर महिन्यात यातील काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार आह़े