शहाद्यात साडेतीन लाखांचे मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:41 AM2017-08-14T11:41:33+5:302017-08-14T11:41:33+5:30

एलसीबीची कारवाई : जीपसह मद्यसाठाचा समावेश

Shahadah boasts of three and a half million alcoholic beverages | शहाद्यात साडेतीन लाखांचे मद्य जप्त

शहाद्यात साडेतीन लाखांचे मद्य जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : खेतिया येथून बेकायदेशिररित्या गुजरात राज्यातील उधना, जि.सुरत येथे मद्याची वाहतूक करणा:या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ पकडले.  त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या जीपसह 66 हजार 500 रुपये किमतीची विदेशी मद्य असा एकूण तीन 66 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत असे की, खेतिया येथून गुजरात राज्यात मद्याची तस्करी केली जाणार असल्याची गुप्तवार्ता मिळाल्यानंतर येथील डोंगरगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपानजीकच्या चौफुलीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीष पाटील, हवालदार विलास अजगे, भटू धनगर यांच्या पथकाने सापळा रचून मध्यरात्रीच्या सुमारास पांढ:या रंगाची जीप क्रमांक जीजे 5 - सीएम 6414 हिला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने अडविण्याचा प्रय} केला असता चालकाने याकडे दुर्लक्ष करीत गाडीचा वेग वाढवत पुढे नेली. या वेळी सिनेस्टाईलने गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी गाडीला अडवून चौकशी केला असता त्यात 66 हजार 500 रुपये किमतीचे बॉम्बे स्पेशल विस्कीचे बॉक्स आढळून आले.
याबाबत शहादा पोलिसात हवालदार विकास अजगे यांच्या फिर्यादीवरून कैलास जनार्दन कोळी (23) रा.उधना व विराज राजू खंडारे (21) रा.उधना जि.सुरत या दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मध्यप्रदेशतून गुजरात राज्यात मद्याची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून, देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. परिणामी दररोज लाखो लिटर बनावट मद्याची तस्करी शहादा तालुक्यातून होत असते. या तस्करीला व तस्करांचा कायम स्वरूपी मुसक्या आवळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Shahadah boasts of three and a half million alcoholic beverages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.