शहाद्यात सहा कोटींचा व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 05:18 PM2018-04-17T17:18:21+5:302018-04-17T17:18:21+5:30

बाजार समिती 10 दिवसांपासून बंद : शेतकरी आर्थिक संकटात, हमाल-मापाडीही बेरोजगार

Shahadah has a debt of six crores | शहाद्यात सहा कोटींचा व्यवहार ठप्प

शहाद्यात सहा कोटींचा व्यवहार ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गेल्या 10 दिवसांपासून शहादा बाजार समिती बंद असल्याने सुमारे सहा कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे. बाजार समितीचा व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तर हमालमापाडी बेरोजगार झाले आहेत.
हरभरा आणि गव्हाला हमी भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे गेल्या 10 दिवसांपासून शहादा बाजार समिती बंद आहे. या बंदचा परिणाम आता तालुक्याच्या एकंदरीतच अर्थकारणावर जाणवू लागला आहे. हंगामात दररोज बाजार समितीत 800 ते एक हजार क्विंटल हरभरा व तेवढाच गहू विक्रीस येत असल्याने दररोज सुमारे 50 ते 60 लाखांची उलाढाल होते. ही उलाढाल 10 दिवसांपासून बंद पडल्याने सुमारे सहा कोटीचे नुकसान झाले आहे. रोजची सुमारे 1500 ते दोन हजार क्विंटल धान्याची आवक-जावक थांबल्याने धान्याचे मोजमाप करणारे मोजमापी, हमाल यांचा रोजगार बुडाला आहे. बाजार समितीतील दीडशे हमालमापाडी बेरोजगार झाल्याने त्यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
बाजार समिती बंद झाल्यामुळे शेतकरी व व्यापारी यांच्यामधील आर्थिक देवाण-घेवाणही थांबल्यामुळे विशेषत: छोटे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अडीअडचणीत शेतीमाल विकून व्यापा:यांकडून उधार उसनवारी करून शेतकरी आपली गरज भागवतात. बाजार समितीत शेतीमालाची खरेदी-विक्रीच बंद झाल्याने शेतकरी व व्यापा:यांमध्ये उसनवारीचा होणारा हा व्यवहारही बंद झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. एकीकडे शेतमाल साठवून ठेवल्याने त्याची प्रतवारी कमी होत आहे तर दुसरीकडे बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने मालाची विक्री होत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. शेतक:यांच्या हातात पैसा नसल्याने तालुक्यातील संपूर्ण आर्थिक घडीच विस्कटली आहे. मार्केटमध्ये मंदीचे सावट पसरले आहे.
आर्थिक देवाण-घेवाण थांबल्याने बँकांचे व्यवहार थंडावले आहेत. एकंदरीतच बाजार समितीच्या बंदने संपूर्ण तालुक्याची आर्थिक नाडी आवळली गेली असून, केवळ शेतकरी व व्यापारीच नव्हे तर हमाल, मापाडी, धान्य वाहतूकदार, इतर व्यावसायिक सारेच आर्थिक अडचणीत आले आहेत.
 

Web Title: Shahadah has a debt of six crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.